वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ” कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर सिटी स्कॅन करण्याचा काहीच फायदा नाही. एक सिटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे इतकं असतं आणि हे खूप हानिकारक आहे,” असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला. CT scan is of no use if the corona has mild symptoms
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणं असूनही RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर CT-SCAN करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
कोरोनाचा विषाणू RT-PCR टेस्टलाही चकवा आणि त्याचे निदान न झाल्याची काही प्रकरणे दिसून आली. त्यामुळे सिटी स्कॅनमध्ये कोरोना असल्याचं निदान होत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अनेक जण CT-SCAN करून घेत आहेत. पण सिटी स्कॅन करणं महागात पडू शकतं, असा इशारा त्यांनी दिला.
CT-SCan and biomarkers are being misused. There is no advantage in doing CT-Scan if you have mild symptoms. One CT-Scan is equivalent to 300 chest x-rays, it's very harmful: AIIMS Director Dr. Randeep Guleria pic.twitter.com/fBX19cwRcD — ANI (@ANI) May 3, 2021
CT-SCan and biomarkers are being misused. There is no advantage in doing CT-Scan if you have mild symptoms. One CT-Scan is equivalent to 300 chest x-rays, it's very harmful: AIIMS Director Dr. Randeep Guleria pic.twitter.com/fBX19cwRcD
— ANI (@ANI) May 3, 2021
डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, “सौम्य लक्षणं असतील तर सिटी स्कॅन करण्याचा काहीच फायदा नाही. एक सिटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे इतकं असतं आणि हे खूप हानिकारक आहे.” सौम्य लक्षणं असलेले रुग्ण कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात. पण मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड घेण्याची गरज आहे. पण तेसुद्धा डॉक्टरांच्या सल्लानुसारच घ्यावं, असंही डॉ. गुलेरिया म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App