२०२१ च्या डिसेंबरअखेरपर्यंत २ अब्ज लसी पुरविण्याचा COVAX चा संकल्प; कॉमनवेल्थ आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेत डॉ. हर्षवर्धन यांची घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोरोनाची जागतिक लाट रोखण्यासाठी भारत योगदान देण्यात अग्रेसर आहे आणि राहील अशी ग्वाही देत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी २०२१ च्या डिसेंबरअखेरपर्यंत २ अब्ज लसी पुरविण्याचा COVAX चा संकल्प असल्याचे कॉमनवेल्थ आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेत जाहीर केले. COVAX aims to deliver at least 2 billion vaccines by the end of 2021, says Union Health Minister Harsh Vardhan at 33rd Commonwealth Health Ministers Meeting

कोरोना प्रतिबंधासाठी भारताने केलेल्या व्यापक उपाययोजनांची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी या परिषदेत दिली. ते म्हणाले, की २०२१ च्या डिसेंबर अखेरपर्यंत २ अब्ज लसी पुरविण्याचे लक्ष्य COVAX ने ठेवले आहे. याचा अर्थ गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या ९२ देशांच्या लोकसंख्येपैकी २० टक्के लोकांची गरज या २ अब्ज डोसमधून भागणार आहे. व्हॅक्सिन मैत्री उपक्रमाला अनुसरून भारताने आधीच ९० देशांना लसी पुरविल्या आहेत. वसुधैव कुटुंबकम् ही त्यामागची भारतीयांची भावना आहे, याकडे डॉ. हर्षवर्धन यांनी कॉमनवेल्थ देशांच्या आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले.



कोरोनाच्या लाटांवर येणाऱ्या लाटा रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करून एकापेक्षा अधिक लसी तयार केल्या पाहिजेत. त्याच्या तातडीच्या चाचण्या करून त्या जलद सर्व देशांमध्ये पोहोचविल्या पाहिजेत. यात भारत आपले योगदान देण्यास तयार आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

-आयुषमान भारत – इ संजीवनी ओपीडीचे यश

भारत सरकारच्या इं संजीवनी या टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मचा लाभ गेल्या १४ महिन्यांमध्ये ५० लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे. तर आयुषमान भारत योजनेचा लाभ सरकारने ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचविला आहे, अशी माहिती देखील डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

COVAX aims to deliver at least 2 billion vaccines by the end of 2021, says Union Health Minister Harsh Vardhan at 33rd Commonwealth Health Ministers Meeting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात