वादग्रस्त : शार्ली हेब्दोचे भारतातील ऑक्सिजन तुटवड्यावर व्यंगचित्र, 3.3 कोटी देवतांचा दाखला देत हिंदू धर्माचाही उपहास, वाचा सविस्तर…

Controversial French Cartoon Magazine Charlie Hebdo Cartoon on Indias Oxygen Shortage making Fun Of Hindu Gods

Charlie Hebdo Cartoon : फ्रान्सचे वादग्रस्त व्यंगचित्र साप्ताहिक ‘शार्ली हेब्दो’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर आणि ऑक्सिजन तुटवड्यावर कार्टूनच्या माध्यमातून टीका केली आहे. शार्ली हेब्दोने या कार्टूनमध्ये हिंदू देवतांची संख्या सांगून एकही देव ऑक्सिजन बनवू शकत नसल्याची टीका केली आहे. सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. Controversial French Cartoon Magazine Charlie Hebdo Cartoon on Indias Oxygen Shortage making Fun Of Hindu Gods


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : फ्रान्सचे वादग्रस्त व्यंगचित्र साप्ताहिक ‘शार्ली हेब्दो’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर आणि ऑक्सिजन तुटवड्यावर कार्टूनच्या माध्यमातून टीका केली आहे. शार्ली हेब्दोने या कार्टूनमध्ये हिंदू देवतांची संख्या सांगून एकही देव ऑक्सिजन बनवू शकत नसल्याची टीका केली आहे. सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

इस्लाम धर्मावर व्यंगचित्रामुळे झाला होता हल्ला

शार्ली हेब्दोने 2012 मध्ये इस्लामवर एक कार्टून प्रसिद्ध केले होते. यावरून तेव्हा इस्लामधर्मीयांमध्ये तीव्र नाराजी होती. 2015 मध्ये नियतकालिकाच्या पॅरिसमधील ऑफिसमध्ये हल्ला झाला होता. यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी तहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) चे आंदोलन याच कारणामुळे झाले होते. लब्बैकने पाकमधील फ्रान्सच्या राजदूतांना देशाबाहेर पाठवण्याीच मागणी केली होती. या मागणीसाठी देशभरात हिंसक आंदोलने झाली, ज्यात 18 जणांचा बळी गेला होता.

भारतातही संताप

देशभरात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. दररोज साधारणपणे तीन-साडेतीन लाख रुग्ण आढळत आहेत. एप्रिलमध्ये तर ऑक्सिजन तुटवड्याने अनेक ठिकाणी मृत्यूही झाले होते. एकदम मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने साहजिकच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांतही मोठ्या प्रमाणात झळकल्या होत्या. फ्रेंच नियतकालिकाने याच मुद्द्याला कार्टूनच्या माध्यमातून धार्मिक रंग दिला आहे. कार्टूनसोबत फ्रेंच भाषेत कॅप्शन आहे. ज्यानुसार, भारतात 33 मिलियन (3.3 कोटी) देवीदेवता आहेत, तरीही कुणीही ऑक्सिजन बनवू शकत नाही.

सोशलवर प्रतिक्रिया

वास्तविक, शार्ली हेब्दोच्या या कार्टूनवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक युजर्सनी शार्ली हेब्दोला टॅग करून त्यांना चूक लक्षात आणून दिली आहे. युजर्स म्हणाले, भारतात 3.3 कोटी नव्हे तर 33 कोटी देवी-देवता आहेत. आणि तुम्ही खात्री बाळगा, यावेळी तुमच्यावर कोणताही हल्ला होणार नाही.

मेजर माणिक यांनी ट्वीट केले की, प्रिय शार्ली हेब्दो, आमच्याकडे 33 कोटी देवी-देवता आहेत. आणि ते आम्हाला युद्धात न हरण्याचा सल्ला देतात. आम्ही फ्रेंच लोकांचाही सन्मान करतो. तेथील वाइन आणि फ्राइजचा येथेही वापर होतो. परंतु मी तुम्हाला विश्वास देतो की, आम्ही तुमचा सन्मान करत असल्याने तुमच्या ऑफिसवर हल्ला करणार नाही. हरहर महादेव!

दुसरा एक युजर विद्यासागरने लिहिले, मी शार्ली हेब्दोची निंदा करतो. त्यांनी आमच्या 33 कोटी देवी-देवतांची संख्या घटवून 3.3 कोटी केली आहे.

हिंदू देवी-देवतांची संख्या 33 कोटी?

हिंदू देवी-देवतांची संख्या नेहमी 33 कोटी सांगितली जाते. धर्मग्रंथांमध्ये देवतांची संख्या 33 कोटीच आहे. वास्तविक संस्कृत भाषेमध्ये कोटीचे दोन अर्थ आहेत. कोटीचा एक अर्थ प्रकार असून एक अर्थ संख्यात्मकही आहे. परंतु देवी-देवतांच्या बाबतीत हा आकडा प्रकार या अर्थाने आहे. अनेक ग्रंथांमध्येच स्पष्टपणे 33 प्रकारच्या देवी-देवतांचे वर्णन मिळते. 12 आदित्य, 8 वसू, 11 रुग्द, इंद्र व प्रजापती असू मिळून 33 देवता आहेत. अर्थात, यावरही अनेक जण खंडन-मंडन करत असतात. काहीही असले तरी ऑक्सिजन तुटवड्याचा संबंध धर्माशी जोडल्याने अनेकांनी समाजमाध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘शार्ली हेब्दो’चा इतिहास…

61 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये एका नियतकालिकाची सुरुवात झाली. पत्रकारितेत काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू करण्यात आले. त्याचे नाव हारकिरी हेब्दो होते. यातही इतर दैनिकांप्रमाणेच बातम्या असायचया. यात वेगळेपणा म्हणजे जवळपास प्रत्येक बातमीत सरकार आणि प्रशासनावर व्यंगात्मक पद्धतीने टीका केली जात होती. यासाठी व्यंगचित्र रेखाटली जात होती. अनेकदा धार्मिक श्रद्धा किंवा परंपरांच्या बाबतही असे केले जात होते.

1970 मध्ये पॅरिसमधील आगीच्या घटनेवर व्यंगचित्र प्रकाशित झाले. यामध्ये राष्ट्रपतींवर तीव्र व्यंग करण्यात आले होते. यानंतर या नियतकालिकावर बंदी घालण्यात आली. काही दिवसांनी हे शार्ली हेब्दो नावाने प्रकाशित होऊ लागले. अनेक आशियाई देशांमध्ये याला चार्ली हेब्दो असेही संबोधतात. 1981 मध्ये आर्थिक डबघाईमुळे ते बंद करावे लागले. 1992 मध्ये त्याचे पुन्हा प्रकाशन सुरू झाले.

2015 मध्ये इस्लाम धर्मावरील कार्टूनमुळे या नियतकालिकाच्या ऑफिसवर हल्ला झाला. या हल्ल्यात संपादक आणि काही पत्रकारांसह एकूण 12 जण ठार झाले. यामध्ये मासिकाचे मुख्य व्यंगचित्रकार स्टीफन चर्नबेर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे इस्लामशी संबंधित ते व्यंगचित्र 2005 मध्ये सर्वात पहिल्यांदा एका डॅनिश वृत्तपत्राने प्रकाशित केले होते. एका वर्षानंतर, ती शार्ली हेब्दोने ते पुन्हा प्रकाशित केले. यानंतर तेच व्यंगचित्र वेळोवेळी प्रकाशित झाले. परंतु २०१२ मध्ये ते पुन्हा छापण्यात आल्यावर मात्र जगभरात चर्चा झाली. इस्लाम धर्मीयांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि याच्या तीन वर्षांनी शार्लीच्या ऑफिसवर जीवघेणा हल्ला झाला.

Controversial French Cartoon Magazine Charlie Hebdo Cartoon on Indias Oxygen Shortage making Fun Of Hindu Gods

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात