three Killed In Shootout At chitrakoot Jail UP, CM Yogi Adityanath Orders Report

Shootout At Chitrakoot Jail : तुरुंगातच झाला गँगवार, मुख्तार गँगरच्या दोघांची हत्या करणाऱ्या गँगस्टरचेही एन्काउंटर

Shootout At Chitrakoot Jail : शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील चित्रकूट कारागृहात कैद्यांमध्ये गोळीबार झाला. यात पश्चिम यूपीचा कुख्यात गुंड अंशु दीक्षितने मुख्तार अन्सारी गँगमधील मेराज आणि मुकीम काला यांची गोळ्या झाडून हत्या केली. मेराजला बनारस तुरुंगातून, तर मुकिम काला याला सहारनपूर तुरुंगातून आणण्यात आले होते. three Killed In Shootout At chitrakoot Jail UP, CM Yogi Aditya Nath Orders Report


विशेष प्रतिनिधी

चित्रकूट : शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील चित्रकूट कारागृहात कैद्यांमध्ये गोळीबार झाला. यात पश्चिम यूपीचा कुख्यात गुंड अंशु दीक्षितने मुख्तार अन्सारी गँगमधील मेराज आणि मुकीम काला यांची गोळ्या झाडून हत्या केली. मेराजला बनारस तुरुंगातून, तर मुकिम काला याला सहारनपूर तुरुंगातून आणण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस दलही पोहोचले. पोलिसांनी अंशु दीक्षितला शरण जाण्यास सांगितले, पण त्याने गोळीबार सुरूच ठेवला. नंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत अंशुही ठार झाला आहे.

अलाहाबाद कारागृहाचे प्रभारी उप महानिरीक्षक पी.एन. पांडे घटनेच्या तपासासाठी रवाना झाले आहेत. तुरुंगात शोध घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व एसपी घटनास्थळी उपस्थित झाले. कारागृहातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, तुरुंगातील गँगवारमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी 6 तासांत मागवला अहवाल

चित्रकूट कारागृहातील गोळीबारप्रकरणी सीएम योगी आदित्यनाथ यांनी डीजी जेलकडून अहवाल मागविला आहे. योगी म्हणाले की, पुढच्या 6 तासांत आयुक्त डीके सिंह, डीआयजीचे सत्यनारायण आणि एडीजी जेल संजीव त्रिपाठी यांनी या प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण अहवाल द्यावा.

या घटनेनंतर तुरुंगामध्ये सध्या तपास मोहीम राबवली जात आहे. या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झालेले तिन्ही गुन्हेगार हे कुख्यात गँगस्टर होते. या गुन्हेगारांचं आपसांतही शत्रूत्व होतं, त्यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पण तुरुंगामध्ये अशी घटना घडत असेल तर शस्त्र आणि इतर साहित्य गुंडांपर्यंत कसं पोहोचलं याचा सध्या शोध घेतला जात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

three Killed In Shootout At chitrakoot Jail UP, CM Yogi Adityanath Orders Report

महत्त्वाच्या बातम्या