हम जितेंगे – Positivity Unlimited : स्वच्छता आणि दृढसंकल्प हेच आरोग्यपूर्ण जीवनाचे सार ; संत ज्ञानदेव सिंह , साध्वी ऋतंभरा यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ या ऑनलाइन व्याख्यानमालेचे चौथे पुष्प वात्सल्य ग्रामच्या संस्थापिका, साध्वी ऋतंभरा आणि पंचायती आखाडा निर्मलचे पिठाधीश ज्ञानदेव सिंह यांनी गुंफले. For Healthy Life Hygiene and determination is must : Statement of Saint Dnyandev Singh, Sadhvi Ritambhara

दिल्ली येथील कोव्हिड रिस्पोन्स टीमच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला अक्षय्य तृतीये निमित्त 11 ते 15 मे पर्यंत सुरु राहणार आहे. उद्या – शनिवारी (ता. 15 ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व्याख्यामालेचे पाचवे आणि अखेरचे पुष्प गुंफणार आहेत.

संत ज्ञानदेव सिंह म्हणाले..

1) भारतीय संस्कृतीत शरीर शुद्धता, आहार , विहार आणि उपचार याची विस्तृत माहिती दिली. ती खरी तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु आता त्याचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे

2) बाहेरून आल्यावर किंवा प्रत:विधीनंतर हात-पाय धुण्याची, जुनी वस्त्र काढून टाकण्याची आणि स्वच्छ चूळ भरण्याची शिकवण पूर्वीपासून भारतीयांना मिळाली आहे. त्याचे आता पालन करा. कडुनिंब, मीठ याने दात स्वच्छ करा.

3) आजाराचे संक्रमण झाले तर डॉक्टर, वैद्य, सरकार यांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करा.

4) मृत्यूचे भय प्रथम मनातून काढून टाका. तुमचा आत्मा अमर आहे, हे जाणा, अगोदरपासून जीवनात स्वच्छतेचे महत्व जाणून आचरण केले तर आजारापासून दूर रहाल.

5) आयुष्यात निराशेला जवळ भटकू देऊ नका, 14 दिवसांच्या काळात तुम्हाला अध्यात्म चिंतनाची संधी मिळाली आहे, हे समजून घ्या. गीता, गुरुबाणी वाचा, मन बलवान बनवा.

6) योग, प्राणायाम करा, मनस्वास्थ्य चांगले राहील, याकडे लक्ष ठेवा. डॉक्टरांची औषधे वेळेवर घ्या.

7) उत्तम, पौष्टिक आहार घ्या. औषधी काढा प्राशन करा. तुळशीपत्र, दालचिनी, ओवा, मुलेठी यांचा काढा आजारापासून तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करेल.

8) सानिटायझरचा वापर करा, बाहेरून आल्यावर गरम पाण्याने स्नान आवश्य करा. त्यामध्ये तुम्ही कडुनिंबाची पानेसुद्धा घालू शकता.

9) शरीर स्वस्थ असेल तर जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्त करता येईल.

10) परमेश्वर प्राप्त करण्याची संधी फक्त मानवी जीवनात आहे. त्यामुळे नामस्मरण करा. तुमचे खरे स्वरूप ओळखा. जान हैं तो जहाँन हैं तत्व अशा कठीण काळात लक्षात ठेवा.

साध्वी ऋतंभरा म्हणाल्या …

1)प्रतिकूल परिस्थितीतच मानवाच्या धैर्याची परीक्षा होते. त्यामुळे संकट आले तरी धैर्याने सामोरे जा.

2) सोन्याला तापवल्यावर सोन्याला झळाळी प्राप्त होते. मानवी आयुष्य असेच आहे. संकटातून तावून सुलाखून गेल्याशिवाय जीवन जगण्याची कला तुम्ही कशी काय शिकणार ?

3) संकट, आपत्तीत ताठ मानेने उभे रहा. कोरोनाला हरविणारच , असा दढ निश्चय करा.

4) महाभारताचे 18 दिवसाचे युद्ध झाले. लक्षावधी योद्धये ठार झाले. पण, भगवान कृष्णाच्या कृपेमुळे टिटवी पक्षिणीसह तिची 4 पिल्ले जिवंत राहिली होती. त्यामुळे देवाकडे जीवनदान देण्याची प्रार्थना करा. अठरा दिवसांचा कालावधी हा तीन आठवड्याचा मानला जातो. तो एक प्रकारचा टिटवीसाठी लॉकडाऊनचा होता. एका हत्तीच्या घंटेखाली टिटवीचे कुटुंब 18 दिवस बंद होते. तशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडू नका.

5) कोरोना संकट काळात एकमेकावर दोषारोप करू नयेत. मानव हा चूक करणार प्राणी आहे. दोषारोप करून संकटावर मात करण्यासाठी लागणारी शक्ती आपण वाया घालवत आहोत, याचे भान ठेवा.

6) सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवून एकजूट होऊन कार्य करण्याची गरज आहे. दगडाला ठेचकाळून त्याला खडा बनवायचे की स्वतः दगडाला ठेचकाळून पडायचे हे तुमच्या हातात आहे.

7) एखादा विषाणू तुमचे जीवन बरबाद करू शकत नाही. त्याची तेवढी शक्ती नाही. न घाबरता सामोरे जा. विजय तुमचा आहे.

8) परिस्थिती जशी आहे. त्या प्रमाणे वागा. मनावर ताबा ठेवा, दृढ संकल्प करा की मी बरा होणार आहे. आत्मविश्वासाने वागा.

9) आंतरराष्ट्रीय षडयंत्रापासून सावध रहा. अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नका. खरे काय खोटे काय हे पूर्ण तपासून निर्णय घ्या.

10) नदीला जेव्हा पूर येतो. तेव्हा पाण्याचे लोंढे पर्वताला देखील कापून टाकतात. अशा प्रसंगी साहसी, धैर्यवान आणि दृढ संकल्प केलेला मनुष्य या संकटाचा सामना करतो. तुम्ही तसे बना.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात