हवामान विभागाचा राज्यात 16-17 मे रोजी ऑरेंज अलर्ट, वाचा.. अलर्टचे प्रकार, कोणत्या अलर्टमध्ये काय काळजी घ्यावी?

Orange Alert In Maharashtra For 16th and 17th May, Know Types Of Weather Alerts and what precautions We Should take

Types Of Weather Alerts : हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटांसाठी सर्वसामान्यांनी सतर्क राहावे, या उद्देशाने हवामान विभागातर्फे वेळोवेळी अलर्ट जारी करण्यात येतात. आताही दि. 16 ते 17 मेसाठी हवामान खात्याने राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे अलर्ट नेमके कशासाठी असतात, त्यांचे प्रकार किती, प्रत्येक अलर्टचा अर्थ काय आहे, या सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या वृत्ताच्या माध्यमातून देत आहोत. Orange Alert In Maharashtra For 16th and 17th May, Know Types Of Weather Alerts and what precautions We Should take


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटांसाठी सर्वसामान्यांनी सतर्क राहावे, या उद्देशाने हवामान विभागातर्फे वेळोवेळी अलर्ट जारी करण्यात येतात. आताही दि. 16 ते 17 मेसाठी हवामान खात्याने राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे अलर्ट नेमके कशासाठी असतात, त्यांचे प्रकार किती (Types Of Weather Alerts), प्रत्येक अलर्टचा अर्थ काय आहे, या सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या वृत्ताच्या माध्यमातून देत आहोत.

महाराष्ट्रात 16 व 17 मे रोजी ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

सर्वप्रथम नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 16 व 17 मे रोजीच्या ऑरेंज अलर्टबाबत जाणून घेऊ. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात तसेच लक्षद्वीपमध्ये गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दि.16 मे रोजी चक्रीवादळात तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ ज्या मार्गावरून व ज्या वेगाने जाणार आहे, त्यावरून ते 18 मे रोजी किंवा नंतर गुजरात व पाकिस्तानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, या चक्रीवादळाच्या मार्गावरील म्हणजेच कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र तसेच गुजरातेतील सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून 16 ते 17 मे रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

केव्हा जाहीर होतात हे अलर्ट?

निसर्गाच्या ऱ्हासामुळे हवामान बदलांचे (Climate Change) संकट उग्र झाले आहे. या बदलांना अनेक घटक कारणीभूत आहेत. पृथ्वीच्या वातावरणातील तापमानात बदल (Globel Warming) होऊन ही संकटे निर्माण होतात. यामध्ये अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक संकटांचा (Natural Disasters) समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीवर मानवाचे नियंत्रण नसले तरी आधीच सतर्क करून नुकसानाची तीव्रता कमी करता येते. यामुळे प्रशासनाकडून आधीच सर्वांना अलर्ट (Weather Alert) जारी केला जातो. आपत्तीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज किंवा रेड या चार प्रकारांमध्ये अलर्ट देण्यात येत असतो. (Green Alert, Yellow Alert, Orange Alert, Red Alert)

दक्षिणपूर्व अरब सागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या 24 तासांत वाढणार आहे. यानंतर याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. चक्रीवादळात अति वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस बरसतो. आता आपण हवामान खात्याच्या विविध अलर्टची माहिती घेणार आहोत.

ग्रीन अलर्ट

ग्रीन अलर्टचा (Green Alert) अर्थ म्हणजे कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक असल्याने काळजीचं कारण नाही.

यलो अलर्ट

या अलर्टमध्ये (Yellow Alert) पुढच्या काही दिवसांत हवामानाच्या बदलांनंतर नैसर्गिक आपत्तीची सूचना दिली जाते. सर्वसामान्यांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होणार असल्याने त्यांना सतर्क करण्यासाठी हा अलर्ट जारी केला जातो.

ऑरेंज अलर्ट

हा अलर्ट थोडा अधिक तीव्रतेचा आहे. या अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्ती कोणत्याही क्षणी येऊ शकते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खबरदार राहावे म्हणून प्रशासन ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करत असते. यात नैसर्गिक संकटामुळे वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार गृहीत धरले जातात. यामुळे या अलर्टमध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे.

रेड अलर्ट

हा सर्वाधिक तीव्रतेचा अलर्ट आहे. मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या अंदाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना सतर्क राहण्यासाठी हा रेड अलर्ट (Red Alert) जारी केला जातो. रेड अलर्ट म्हणजे स्वत:ला तसेच इतरांना सुरक्षित ठेवा, अतिजोखमीच्या ठिकाणी जाणे टाळा. या अलर्टमध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरली जाते.

Orange Alert In Maharashtra For 16th and 17th May, Know Types Of Weather Alerts and what precautions We Should take

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात