Eid Mubarak : पीएम मोदी, राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा, उत्सवी वातावरणात अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीचा विसर

Eid Mubarak Wishes By PM Modi and President Kovind, Rahul gandhi

Eid Mubarak : ईद-उल-फित्रचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. इस्लामधर्मीयांच्या या आनंदोत्सवात एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. याचवेळी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना उत्सव साजरा करताना सामाजिक अंतर राखण्यासारख्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने देशातील दिग्गज नेत्यांनीही जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Eid Mubarak Wishes By PM Modi and President Kovind, Rahul Gandhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ईद-उल-फित्रचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. इस्लामधर्मीयांच्या या आनंदोत्सवात एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. याचवेळी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना उत्सव साजरा करताना सामाजिक अंतर राखण्यासारख्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने देशातील दिग्गज नेत्यांनीही जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या दिवशी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “ईद-उल-फित्रच्या शुभ पर्वावर शुभेच्छा. सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना. आपच्या सामूहिक प्रयत्नांनी आपण जागतिक महामारीवर मात करू आणि मानवी कल्याणासाठी प्रगतीच्या दिशेने कार्य करू शकू. ईद मुबारक!”

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईदच्या शुभेच्छा देऊन ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “ईद मुबारक सर्व देशवासीयांना! हा सण परस्पर बंधुता आणि सद्भावना दृढ करण्यासाठी आणि मानवतेची सेवा करण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करण्याची संधी आहे. कोविड-19 संपुष्टात आणण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याचा तसेच समाज व देशाच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प करा. सर्व देशवासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा!”

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ईदच्या दिवशी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “या कठीण काळात एकमेकांना बंधुत्वाची मदत करणे हा प्रत्येक धर्माचा धडा आहे – ही आपल्या देशाची परंपरा आहे. आपणा सर्वांना ईद मुबारक!”

कोरोना महामारीमुळे देशभर निराशेचे वातावरण असताना ईदचा हा सण आला आहे. कोरोनामुळे दररोज हजारोंचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत ईद साजरी करण्यासाठी लोक महामारीकडे दुर्लक्ष करून सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतानाही दिसले. पंजाबमधील अमृतसरच्या जामा मशीद खैरुद्दीन हॉल बाजारात ईदची नमाज अदा करण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी होती. असेच चित्र देशातील अनेक भागांतही दिसून आले. याचवेळी दिल्ली- मुंबईसारख्या महानगरांत तसेच अनेक छोट्या शहरांत लोकांनी आपापल्या घरीच ईदची नमाज अदा करून कोरोना नियमावलीचे पालनही केले.

Eid Mubarak Wishes By PM Modi and President Kovind, Rahul gandhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात