सेंगोल राष्ट्रीय वारसा काँग्रेसने का दडवला??, “रहस्य” उघड; “नेहरूंची सोनेरी काठी” म्हणून ठेवला होता अलाहाबाद संग्रहालयात!!


नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी 28 मे 2023 सावरकर जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र सेंगोल अर्थात राजदंड लोकसभेत प्रस्थापित करणार आहेत. हा सेंगोल अर्थात राजदंड दक्षिणेतील चोल राजवंशीयांचा राजसत्तेचे प्रतीक आहे. 14 ऑगस्ट 1947 या दिवशी हा पवित्र सेंगोल पंतप्रधान पंडित नेहरूंना सोपविला होता. ब्रिटिशांकडून भारतीयांकडे हस्तांतरित झालेल्या सत्तेचे तो पवित्र प्रतीक आहे.Congress termed holy sengol as Nehru’s golden walking stick and kept it in allahabad museum

पण एवढा मोठा हा ऐतिहासिक वारसा काँग्रेसने आतापर्यंत का दडवून ठेवला होता?? नेहरू – गांधी परिवाराला किंवा त्यानंतरच्या पंतप्रधानांना या पवित्र राष्ट्रीय वारसाचे काहीच महत्त्व वाटले नव्हते का??, असा सवाल “द फोकस इंडिया”ने उपस्थित केला होता.



आता त्यामागचे “रहस्य” दूर झाले आहे. पंडित नेहरूंनी तमिळ पंडितांकडून स्वीकारलेला चोल राजवंशीयांचा हा पवित्र सेंगोल काँग्रेस नेते आणि सरकारांनी नेहरूंची “सोनेरी छडी” अर्थात चालण्याची काठी ठरविला होता. प्रयागराज अर्थात पूर्वीच्या अलाहाबाद संग्रहालयामध्ये “नेहरू की सूनहरी छडी” अर्थात वॉकिंग स्टिक म्हणून तो जपून ठेवला होता. हा तमिळ चोल राजवंशीयांचा सेंगोल आहे, तो राजसत्तेचे प्रतीक आहे हे त्यावेळच्या राज्यकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांच्या अंकित असलेल्या संग्रहालय प्रशासनाला मान्य नव्हते.

पण 2022 मध्ये हा पवित्र सिंगल अलाहाबादच्या संग्रहालयातून नवी दिल्लीत आणण्यात आला. त्यासाठी विशिष्ट सरकारी प्रक्रिया पूर्ण केली गेली. उत्तर प्रदेशच्या तत्कालीन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची खास परवानगी घेण्यात आली आणि तो सेंगोल राजधानी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आला.

काँग्रेसच्या नेत्यांनी या सेंगोलचे मूळ राजदंड राजदंड म्हणून महत्त्वचं संपवून टाकले होते. त्याची काँग्रेस नेत्यांनी संभावना नेहरुंची सोनेरी छडी अर्थात वॉकिंग स्टिक या स्वरूपात केली होती. त्याचे राजदंड म्हणून ऐतिहासिक अध्यात्मिक राजकीय महत्त्व काँग्रेसने नाकारले होते. नेहरूंच्या वैयक्तिक भेटींमध्ये त्याचा समावेश काँग्रेस सरकारने केला होता आणि तो राष्ट्रीय महत्त्वाचा वारसा बाकीच्या सरकारांनी देखील गेली 75 वर्षे तसाच पुढे चालवत ठेवला होता.

पण आता मोदी सरकारच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी त्या सेंगोलची पवित्रता, आध्यात्मिक आणि राजकीय महत्त्व लक्षात घेऊन त्याची प्रतिष्ठापना पूर्ण अध्यात्मिक आणि राजकीय सन्मानाने नव्या संसद भवनात लोकसभेच्या सभापतींच्या आसनानजीक होत आहे. तो सेंगोल आता “नेहरूंची सोनेरी छडी” अर्थात वॉकिंग स्टिक उरलेला नाही, तर तो भारतीय सार्वभौम राजसत्तेचे प्रतीक म्हणून खऱ्या अर्थाने न्यायदंड ठरला आहे!!

Congress termed holy sengol as Nehru’s golden walking stick and kept it in allahabad museum

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात