लडाख सीमेवरील चीनच्या जनरलची उचलबांगडी


विशेष  प्रतिनिधी

बीजिंग : भारत- चीन सीमेवर सात महिन्यांपासून लडाख परिसरात तणाव आहे. त्याला कारणीभूत असलेल्या चीनच्या पश्चिम विभाग कमांडरची झाली आहे. जनरल झाहो झोंगकी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या जागी लडाख आणि भारत चीन सीमाची माहिती नसणारे जनरल झांग झुडोंग यांची नियुक्ती केली आहे. China shifted general zao zonki from ladakh

जनरल झाहो झोंगकी यांचा चीनच्या लिब्रेशन आर्मीत दबदबा आहे. जनरल झाहो यांच्या उचलबांगडी भारतविरोधी मानली जात नाही. भारत आणि भूतान सीमेवर 2017 मधील वाद ही जनरल झाहो यांच्यामुळे चिघळला होता. China shifted general zao zonki from ladakh

जनरल झांग झुडोंग हे झाहो यांच्यापेक्षा तरुण म्हणजे 58 वर्षांचे आहेत. परंतु भारत चीन सीमेवर कधीही काम केले नाही. झाहो 65 वर्षांचे असून ते उन्हाळ्यात निवृत्त होत आहेत.

आगामी लष्करी बैठकीत नवीन जनरल झुडोंग यांचे मनसुबे आणि धोरणे समजून येतील. जनरल झांग यांची चीनचे नेतृत्व करण्याची राजकीय अभिलाषा त्यांच्या पूर्वसुरीप्रमाणे आहे का? परफॉर्मन्सवर ते लक्ष्य गाठू शकतात.

भारतीय लष्कराच्या मते झाहो हे कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीचे सदस्य असून त्यांना केंद्रीय लष्कराच्या कमिशनवर जायचे आहे. सध्या त्यांचे वय 65 असून ते तेथे 72 वर्षापर्यंत कार्य करू शकतात.

किनारपट्टीच्या लायनिंगच्या प्रांतात जन्मलेला, जनरल झांग हा हान वंशीय आहे. त्याने पूर्वोत्तर चीनमधील शेनयांग मिलिटरी प्रांतात सेवा बजावली. पीएलएच्या 39 व्या लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ होते.

China shifted general zao zonki from ladakh

मार्च 2017 ते जानेवारी 2018 पर्यंत झांग हे राजधानी बीजिंगच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सेंट्रल थिएटर कमांड (सीटीसी) चे डिप्टी कमांडर होते.

2019 मध्ये चीनच्या स्थापनेचा 70 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी लष्करी परेडमध्ये झांग यांनी संयुक्त लष्करी परेडचे उप-कमांडर म्हणून काम केले. ज्याचे व्यापक कौतुक झाले.

चेंगदूला वेस्टर्न थिएटर कमांडर म्हणून बदली झालेले झांग केंद्रीय समितीचा किंवा नॅशनल पीपल्स कॉंग्रेसचा सदस्य नाही. ‘राजकीय अभिलाषाही नाही.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात