विनायक ढेरे
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा १२ मंत्र्यांचा राजीनामा, तर ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश, हेच नुसते मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचे वैशिष्ट्य राहिलेले नाही किंवा ही नुसती political adjustment नाही, तर कामगिरी नाही, मंत्रिपद नाही, असा हा रोखठोक खाक्या आहे. रोखठोक लिहिणे वेगळे आणि रोखठोक काम करणे वेगळे, हे मोदींनी कॅबिनेट – २ मध्ये दाखवून दिले आहे. CabinetReshuffle; Not kamraj plan or indira shock; but modi`s own doctrine…, perform or…
ज्या १२ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातून रावसाहेब पाटील दानवे आणि संजय धोत्रे यांचा समावेश आहे. ते आता खासदार राहतील. पण त्यांच्या जागी हिना गावित आणि प्रीतम मुंडे यांचा समावेश करून महाराष्ट्र भाजपमधल्या तरूण चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र भाजपसाठी ही दीर्घकालीन योजना ठरू शकते.
पण त्याही पलिकडे जाऊन पाहिले असता, मोदींचा मंत्रिमंडळ फेरबदल म्हणजे कामराज योजना नव्हे, की जे केंद्रीय मंत्री पंतप्रधानांनाच जड झालेत, त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढून पक्षाच्या कामाला लावायचे आणि पंतप्रधानांपुढचे राजकीय आव्हान मोडून काढायचे… असला हा “नेहरू प्रकार” नाही किंवा “इंदिरा धक्कातंत्र” देखील नाही.
पंडित नेहरूंनी मोराजजी देसाईंसह आपल्याला जड झालेल्या मंत्र्यांना काढून काँग्रेस पक्षवाढीच्या कामाला लावले होते. त्याला कामराज योजना असे नाव दिले गेले. कारण त्यावेळी के. कामराज हे तामिळनाडूतले दिग्गज नेते काँग्रेसचे अध्यक्ष होते.
इंदिराजी कायम वजनदार मंत्र्यांची खाती फिरवत असत. य़शवंतराव चव्हाण, जगजीवनराम, सरदार स्वर्णसिंग या मंत्र्यांना त्यांनी कधीही कोणत्याच महत्त्वाच्या खात्यामध्ये अडीच ते तीन वर्षांपेक्षा जास्त ठेवले नाही. वजनदार मंत्र्यांची खाती बदलणे आणि मुख्यमंत्र्यांची आसने अस्थिर ठेवणे हा इंदिराजींचा राजकीय खेळ होता.
पंतप्रधान मोदींनी नेहरू – इंदिरा या दोन्ही नेत्यांची स्टाइल स्वीकारलेली नाही. मोदी हे प्रचारक आहेत. त्यांनी भूमिका बदललेलीच नाही. इथे तुमचे काम करा आणि मंत्रिपद टिकवा नाही तर जा, असा रोखठोक खाक्या आहे. अर्थात कोणाला इंदिराजींच्या दादागिरीसारखे बाहेर जायला सांगण्यात आलेले नाही.
जे बाहेर गेलेत ते काही सगळेच राजकीय निरपयोगी ठरविले गेलेले नाहीत. त्यांच्यासाठीही पक्षामध्ये वेगवेगळ्या स्तरावर कामाची व्यवस्था झाली असणार आहे. शिवाय अनुराग ठाकूरांसारख्या मंत्र्याना बढती मिळते आहे. यातला राजकीय संदेश इतरांनी घेण्यासारखा आहे.
बाकी सोशल इंजिनिअरिंग, जातवार, प्रांतवार गणिते या आधारे मोदी मंत्रिमंडळाचे विश्लेषण चालू आहे. शिवाय २०२४ केंद्रीत हे मंत्रिमंडळ असल्याचे बोलले जात आहे. पण ते तेवढेच फक्त असण्याची शक्यता कमी आहे. कारण हे मोदी कॅबिनेट आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App