आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? महाराष्ट्रात उद्योग येणारच इथे प्रगती होणारच फक्त जरा आदर्श पलीकडे पहा. आपल राज्य अजून उत्तम कसं होईल याचा विचार करा, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? महाराष्ट्रात उद्योग येणारच इथे प्रगती होणारच फक्त जरा आदर्श पलीकडे पहा. आपलं राज्य अजून उत्तम कस होईल याचा विचार करा, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ashok chavan latest news
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटी संबंधी योगी आदित्यनाथ चर्चा करणार असून गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला होता. त्याला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे.
देशातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या भागात उद्योग उभा राहावा यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे, असे म्हणत भाजप नेते माधव भांडारी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची पाठराखण केली आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी दौऱ्यात अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली.
या वेळी मुख्यमंत्री योगी यांनी अक्षय कुमार यांना सांगितले की, राज्य सरकार फिल्म पॉलिसी-२०१८ च्या माध्यमातून चित्रपट निर्मिती उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. राज्यात चित्रपटाच्या शूटिंगमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि राज्यातील कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखविण्याची संधी मिळते. राज्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निर्मात्यांना प्रत्येक शक्य सहकार्य आणि सुविधा दिली जात आहे. राज्य सरकार चित्रपट धोरणांच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीच्या कामांना प्रोत्साहन देत आहे. राज्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निर्मात्यांना प्रत्येक शक्य सहकार्य आणि सुविधा पुरविली जात आहे.
मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या भेटी दरम्यान अक्षय कुमार यांनी चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अक्षय कुमार यांनी योगी आदित्यनाथ यांनी राज्यात फिल्म सिटी सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. अक्षय कुमार यांनी सीएम योगी यांना सांगितले की, त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वीही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे.
बैठकीनंतर सीएम योगी यांनीही फोटो ट्विट केला आहे. त्यांनी लिहिले की, आज मुंबईतील भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अक्षयकुमारची भेट झाली. चित्रपट जगातील विविध पैलूंबद्दल त्यांच्यासोबत अर्थपूर्ण चर्चा केली. आपल्या कार्याबद्दल त्यांची समज, समर्पण आणि सर्जनशीलता ही युवकांसाठी प्रेरणादायक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App