वायूसेनेच्या गणवेशात आक्षेपार्ह वक्तव्ये, अनिल कपूर यांनी मागितली माफी


वायूसेनेच्या गणवेशात चुकीची वक्तव्ये करत आक्षेपार्ह संभाषण करणारा प्रोमो टाकल्यानंतर अभिनेता अनिल कपूर याच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. वायू सेनेनेही त्यावर आक्षेप घेतल्यानंतर अनिल कपूरने माफी मागितली आहे.  Anil Kapoor apologizes


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वायूसेनेच्या गणवेशात चुकीची वक्तव्ये करत आक्षेपार्ह संभाषण करणारा प्रोमो टाकल्यानंतर अभिनेता अनिल कपूर याच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. वायू सेनेनेही त्यावर आक्षेप घेतल्यानंतर अनिल कपूरने माफी मागितली आहे. Anil Kapoor apologizes

अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्या एके ४७ व्हर्सेस एके ४७ चित्रपटाचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अनिल कपूर भारतीय वायु सेनेच्या गणवेशात दिसत आहेत आणि हा गणवेश घालून ते चुकीच्या पद्धतीने संभाषण करताना दिसत आहे. त्यामुळे वायुसेनेने या दृश्यांवर आक्षेप घेतला होता. अशा प्रकारच्या दृष्यांमुळे वायु सेनेचा अपमान होत असून हा सीन चित्रपटामधून काढून टाकावा अशी मागणी वायु सेनेने केली आहे. Anil Kapoor apologizes

यावर माफी मागताना अनिल कपूर म्हणाला की, या चित्रपटात मी वायु सेनेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत संबंधित अधिकाऱ्याची मुलगी हरवलेली आहे. त्यामुळे गोंधळलेला बाप जसा वागेल तशीच प्रतिक्रिया मी दिली आहे.



पण माझ्या काही वाक्यांमुळे जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. मला आणी माझ्या पूर्ण टीमला भारतीय वायुसेनेबद्दल नितांत आदर आहे. कोणाचा अपमान करण्याच्या हेतूने तो सीन शूट केलेला नव्हता.

Anil Kapoor apologizes

या चित्रपटातील प्रोमोमध्ये असं दिसून येत आहे की, अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरचं अपहरण झालेलं आहे. अनुरागने अनिल कपूरला फक्त दहा तासांचा अवधी दिलेला असतो. या दहा तासांमध्ये अनिल कपूरला आपल्या मुलीला शोधायचं असतं. या फिल्मचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानीने केले आहे

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात