सोनिया गांधीनी जबाबदारीने बोलावे, निर्मला सीतारामन यांची हात जोडून विनंती


स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावरून देशातील वातावरण कलुषित करणाऱ्या कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हात जोडून विनंती केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावरून देशातील वातावरण कलुषित करणाऱ्या कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाच जोडून विनंती केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. याबाबत गेल्या पाच दिवसांपासून प्रत्येक क्षेत्रानुसार सविस्तर तपशिल अर्थमंत्री सांगत आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, मला विरोधी पक्षांना आवाहन करायचे आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे.

आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत. सोनिया गांधी यांना हात जोडून मी विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे. त्यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि या मुद्यावरून राजकारण करू नये. स्थलांतरीत मजुरांची जबाबदारी त्यांनी समजून घ्यायला हवी.

सरकारकडून जारी करण्यात आलेलं आर्थिक पॅकेज एक नाटक असल्याचा आरोप काँग्रेसकडून होतोय. पण खरे ड्रामेबाज तेच आहेत. राहुल गांधी रस्त्यावर बसून त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्यांचा वेळ उगाचच वाया घालवतात. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना आणि सामान घेऊन त्यांच्यासोबत चालून त्यांची मदत करायला हवी होती.

काँग्रेसशासित आणि त्यांच्या सहयोगी राज्यांत या मुद्द्याचे राजकारण होत असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यांतून मागणी करावी आणि हव्या तेवढ्या रेल्वे बोलवावायला हव्या होत्या. ते हे का करत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. मजुरांनी जेथे आहेत तेथेच राहावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते.

सरकार त्यांच्या राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेसाठी सर्वतोपरी मदत करत आहे. परंतु, लोकांना घरी जायचंच असल्याने केंद्र आणि रेल्वेनं विशेष रेल्वे चालवण्याचाही निर्णय घेतला. रेल्वे तयार आहेत, राज्यांकडून जेवढ्या रेल्वेची मागणी केली जाईल तेवढ्या रेल्वे त्यांना पुरवण्यात येतील, असेही सीतारामन यांनी सांगितले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात