विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळले आहे. शहरातील रुग्णांची संख्या ६७ झाली असून यात ४ रुग्ण दगावले आहे.
आज मिळालेल्या आकडेवारीनुसार मालेगाव शहरात आज ५ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात ५ रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. यातील ५ ही रुग्ण पुरुष असून यात एका १८ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नाशिक शहरात ४ नवीन रुग्ण आढळून आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App