डोकं फिरलंया, बाबाचं डोकं फिरलया…मोदींना व्हाईट हाऊसने केले अनफॉलो

उपकाराची किमान जाणीव ठेवणे हे कृतज्ञतेचे लक्षण मानले जाते. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून त्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे सगळे जग म्हणते ते खरेच ठरत आहे. धार्मिक स्वातंत्र्यावरून अमेरिकेने गरळ ओकलेला अहवाल भारताने फेटाळल्यावर व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती भवनालाही ट्विटरवर अनफॉलो केले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : उपकाराची किमान जाणीव ठेवणे हे कृतज्ञतेचे लक्षण मानले जाते. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून त्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे सगळे जग म्हणते ते खरेच ठरत आहे. धार्मिक स्वातंत्र्यावरून अमेरिकेने गरळ ओकलेला अहवाल भारताने फेटाळल्यावर व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती भवनालाही ट्विटरवर अनफॉलो केले आहे.

चीनी व्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेच्या भावनेतून अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत केली होती. त्यासाठी पुढाकार घेऊन निर्यात कायद्यामध्ये बदलही केला होता. परंतु, डोनाल्ड ट्रंप यांना चीनी व्हायरसवर लढण्यापेक्षा जगाची फौजदारी करण्याची जास्त खुमखुमी आहे.

त्यामुळेच आज संपूर्ण जग चीनी व्हायरसच्या विरोधात लढत असताना आणि भारताने याबाबत उदाहरण घालून दिले असताना भारतात पद्धतशीरपणे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याने भारताचा ‘विशेष चिंता’ असलेल्या देशांमध्ये समावेश करावा अशी शिफारस अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाने ( अहवालात केली आहे. भारताने अमेरिकी समितीचा अहवाल भारताने मंगळवारी फेटाळून लावला आहे. पण त्यामुळेच कदाचित व्हाईटहाऊसने अनफॉलो करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या मदतीनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील ट्विटर अकाउंट्सना फॉलो करण्यात आले होते. पण, आता अचानक काही दिवसांमध्येच व्हाइट हाउसने मोदींसह सर्व भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केले आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास यांच्या ट्विटर हँडलचा समावेश होता. यासोबत व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून फॉलो केले जाणारे मोदी जगातील पहिले नेते ठरले होते.

व्हाइट हाउसने अचानकपणे भारतीय हँडल्स अनफॉलो का केले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, यातून डोनाल्ड ट्रंप यांचा विक्षिप्तपणा समोर आल्याचे बोलले जात आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात