फेसबुकवर जगात सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी


चीनी व्हायरसविरुध्द यशस्वीपणे आणि प्राणपणाने लढा देत असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण जगातून फेसबुकवर फॉलो केले जात आहे. त्यामुळे मोदी फेसबुकवरील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांना फेसबुकवर साडेचार कोटी लाईक्स मिळाले आहेत.


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : चीनी व्हायरसविरुध्द यशस्वीपणे आणि प्राणपणाने लढा देत असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण जगातून फेसबुकवर फॉलो केले जात आहे. त्यामुळे मोदी फेसबुकवरील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांना फेसबुकवर साडेचार कोटी लाईक्स मिळाले आहेत.

ग्लोबल कम्युनिकेशन्स एजन्सी बर्सन कोहन अ‍ॅँड वोल्फ ने गुरूवारी २०१० मधील ‘वर्ल्ड लिडर्स आॅन फेसबुक’ ही यादी जाहीर केली. यामध्ये ही माहिती दिली आहे.

चीनी व्हायरसच्या उद्रेकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुक, ट्विटरवर सातत्याने जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या आश्वस्त करणार्या संवादाने लोकांना हायसे वाटत आहे. त्यामुळे मोदी यांच्या फॉलोअरर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.
ट्रंप यांनी नुकत्याच भारत भेटीमध्ये आपण फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी फेसबुकचे संस्थापक-अध्यक्ष मार्क झुकेरबर्ग यांनी केलेल्या ट्विटचा दाखला दिला  होता.

ते म्हणाले होते की, मार्क झुकेरबर्ग यांनी नुकताच मी फेसबुकवर सर्वात लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. मोदी दुसर्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मी खूपच उत्साहित आहे. मात्र, ट्रंप यांचा दावा फोल ठरला आहे.

डोनाल्ड ट्रंप हे देखील फेसबुकवर लोकप्रिय आहेत. मात्र, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मात्र मोदी यांच्यापेक्षा निम्मी म्हणजे २ कोटी ७० लाख आहे. मात्र, ट्रप यांच्या फेसबुक पेजवर संवाद जास्त होतो. अर्थात याचे कारण म्हणजे ट्रंप यांची वादग्रस्त वक्तव्ये असतात. त्यावर त्यांना विरोध केला जातो. गेल्या बारा महिन्यात त्यांच्या फेसबुक पेजवर ३०.९ कोटी लाईक्स आणि कॉमेंटस आल्या आहेत. ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो हे देखील  सतत वादग्रस्त वक्तव्ये करत  असतात. त्यांच्या फेसबुक पेजवरही २०.५ कोटी कॉमेंटस आणि लाईक्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेजवर मात्र ८.४ कोटी लाईक्स, कॉमेंटस आहेत.

या कंपनीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून अभ्यास केला जात आहे. यामध्ये फेसबुक पेजवरील प्रत्येक पोस्ट प्रत्यक्षात किती लोकांपर्यंत पोहोचते हे देखील अभ्यासले जाते. मोदींची प्रत्येक पोस्ट ही १७ लाख फॉलोअरपर्यंत पोहोचते. बोल्सोनोरा यांची पोस्ट सरासरी ९.५६ लाखांपर्यंत पोहोचते. ट्रंप यांची मात्र ८.७७ लाखांपर्यंत पोहोचते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात