जादूटोणामागे आयुर्वेद, त्यामुळेच निवडून आलो : नरहरी झिरवाळ


निवडणूक जिंकण्यासाठी कोण काय  करेल आणि यशापयशाचे श्रेय कशाला देईल, हे सांगणं अवघड. पण विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ जे म्हणाले त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.


विशेष प्रतिनिधी 
मुंबई : जादूटोण्यामागे आयुर्वेद आहे, त्यामुळेच लाटेतही निवडून आलो होतो असे वक्तव्य विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्याची तयारीही केली आहे.
झिरवाळ यांनी विधानसभेत निवडीनंतर केलेले भाषण व्हायरल होत आहे. या भाषणात झरीवळ यांनी जादूटोण्याचे समर्थन केल्याची अंनिसच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. मात्र, विधानसभा सदस्याला विशेषाधिकार असल्यामुळे त्याबाबत रितसर तक्रार देता येत नाही, असेही या कार्यकर्त्याने सांगितले. मात्र, पुरोगामी विचारांचा पक्ष असे म्हणविणाऱ्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येणार आहे.
आमच्या आदिवासी भागात जाळी, मुळी जादूटोणा चालतो. सगळी शिकली सवरली म्हणून येथे बोलतात पण घरी वेगळे असतात. पण जादूटोणा विरोधी कायदा आपण केला, असेही  झिरवाळ म्हटले आहेत. त्यांच्या बोलण्याचा टोन विनोदी आहे. 2014 मध्ये मोदी लाटेतही निवडून आले असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्याला उत्तर देताना विनोदी ढंगात झिरवाळ बोलणेही असतील. मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या प्रतिष्टीत सभागृहात ते बोलले आहेत. त्यांचे भाषण पटलावर नोंदविले गेले आहे.
जादूटोणा विरोधी कायद्यासाठी डॉ. नरेन्द्र दाभोलकर हुतात्मा झाले. या कायद्याचा अशा प्रकारे उल्लेख करणे त्यांचा अपमान आहे, असेही अंनिसचे म्हणणे आहे. त्यामुळेच झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी किंवा शरद पवार यांनी त्याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मोठ्या या संसाराची होतीय माती…. लगीन करायची आता वाटतेय भिती
वास्तविक समाजप्रबोधन करणारे कलापथक चालविणारा कलाकार म्हणून  झिरवाळ यांची ओळख आहे. अनेकदा ते सार्वजनिक कार्यक्रमात देखील आपली कला सादर करतात. बाल विवाह, कुटुंब नियोजन यावर जनजागृतीपर ‘बंधू- भगिनींनो विचार करा….. दोन पानांचा संसार करा…. मोठ्या या संसाराची होतीय माती…. लगीन करायची आता वाटतेय भिती.’ ही त्यांची गाणी खूपच गाजली आहेत. या गाण्यांचे सादरीकरण करून ते लोकांचे लक्ष वेधून घेत.
झिरवाळ हे नाशिक जिल्यातील दिंडोरी मतदारसंघातुन निवडून आले आहेत. अजित पवार यांनी दे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर ते शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी सापडले होते.  ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असे ते म्हणाले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात