चीन्यांच्या टिकटॉकवरही लोक टाकताहेत बहिष्कार


चीनी व्हायरसमुळे आलेली महामारी आणि दुसऱ्या बाजुला सीमेवर चीन्यांकडून सुरू असलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतातील जनता आता चीनी व्हिडीओ कंटेट अ‍ॅप टिकटॉकवर बहिष्कार टाकू लागले आहेत. अ‍ॅप इंटेलिजन्स फर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार एप्रिलमध्ये या टिकटॉक या अ‍ॅपचे डाऊनलोड ३४ टक्यांनी कमी झाले आहे. मे महिन्यात आतापर्यंत डाऊनलोडमध्ये २८ टक्के घट झाली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसमुळे आलेली महामारी आणि दुसऱ्या बाजुला सीमेवर चीन्यांकडून सुरू असलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतातील जनता आता चीनी व्हिडीओ कंटेट अ‍ॅप टिकटॉकवर बहिष्कार टाकू लागले आहेत. अ‍ॅप इंटेलिजन्स फर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार एप्रिलमध्ये या टिकटॉक या अ‍ॅपचे डाऊनलोड ३४ टक्यांनी कमी झाले आहे. मे महिन्यात आतापर्यंत डाऊनलोडमध्ये २८ टक्के घट झाली.

टिकटॉक एक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. यावर यूजर्स १५ सेकंदांचे व्हिडिओ अपलोड करू शकतात. या व्हिडिओंमध्ये आपण म्युझिक क्लिप्स किंवा आवाज जोडू शकतो. सिनेमांमधील प्रसिद्ध डायलॉगवर ओठांची हालचाल (लिपसिंक) करू शकतो. यात एडिटिंग टूल्स असल्याने विविध इफेक्टही मिळतात. भारतातले १० कोटी लोक टिकटॉक वापरत होते.

याच वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये डाऊनलोडमध्ये वाढ झाली होती. फेब्रुवारीमध्ये ७ टक्के आणि मार्चमध्ये ८ टक्के वाढले. अहवालानुसार, ३.५५ कोटी वापरकर्त्यांनी मार्चमध्ये टिकटॉक अ‍ॅप डाऊनलोड केले. एप्रिलमध्ये हा आकडा घटून २.३५ कोटी झाला. मे महिन्यात २३ तारखेपर्यंत केवळ १.७ कोटी वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले.

मात्र, चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर जगभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. टिकटॉक हे चिनी अ‍ॅप असल्याने अनेक जण त्याच्यावर नाराज झाले आहे. देशातील अनेक कंपन्यांनी चीनी व्हायरसच्या संकटात मदत केली. मात्र, टिकटॉकसारख्या कंपन्यांनी भारतातून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवूनही काहीही मदत केली नाही. त्यामुळे लोकांची नाराजी आणखी वाढली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात