शेतकरी आंदोलनाला शाहिनबाग-2 बनविण्याचा डाव, योगी आदित्यनाथ यांचा आरोप


आसामला भारतापासून तोडण्याची भाषा करणारे शरजील इमाम आणि दिल्लीमध्ये दंगली भडकाविण्याचा कट करणारा उमर खालिद यांच्यासारखे लोक शेतकरीप्रेमी कधीपासून झाले असा सवाल करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शाहिनबाग -२ बनविण्याचा डाव असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : आसामला भारतापासून तोडण्याची भाषा करणारे शरजील इमाम आणि दिल्लीमध्ये दंगली भडकाविण्याचा कट करणारा उमर खालिद यांच्यासारखे लोक शेतकरीप्रेमी कधीपासून झाले असा सवाल करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शाहिनबाग -२ बनविण्याचा डाव असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

Yogi Adityanath allegation of making the farmers’ movement Shahinbagh-2

योगी आदित्यनाथ म्हणाले की, शेरजील इमाम किंवा उमर खालिदसारखे लोक शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनू लागले आहेत. या लोकांना शेतकऱ्यांचा कळवळा कधीपासून आला. शेतकरी आपला अन्नदाता आहे. देशाच्या समृध्दीमध्ये त्याचे मोठे योगदान आहे. मोदी सरकारने शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा गौरव केला आहे.

भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात, हैद्राबादमधील निवडणूक निकालाबाबत योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

परंतु, या आंदोलनात शेरजील इमाम, उमर खालीद आणि नक्षलवाद्यांचा सन्मान केला जातो तेव्हा हे निश्चितपणे म्हणावे लागेल की आंदोलन भटकले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ बहाणा आहे. त्याच्या आडून देशातील सद्भावना संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणीही सच्चा भारतीय याला पाठिंबा देणार नाही. हे सहन करणार नाही, असे मोदी म्हणाला.

Yogi Adityanath allegation of making the farmers’ movement Shahinbagh-2

आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीची सर्वात मोठी ताकद ही संवाद आहे, असे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले, या आंदोलनामध्ये संवादच साधला जात नाही. दररोज वेगवेगळ्या अटी सांगितल्या जात आहे. याचा अर्थ त्यांना आंदालन संपवायचे नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या दूर राहिल्या आणि आता यातून देशद्रोही, नक्षलवादी यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात