राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले; बाळासाहेब थोरातांचा पलटवार


  • यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचेही समर्थन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ज्येष्ठत्व मान्य आहे पण ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडलेत, अशी टिपण्णी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे – पवार सरकारमधील कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करून यशोमती ठाकूरांचे समर्थन केले. sharad pawar couldnt understand rahul gandhi

राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव असून पक्षात त्यांची स्वीकारार्हता आहे का हे पहावे लागेल, असे काँग्रेसला डिवचणारे वक्तव्य शरद पवारांनी नुकतेच एका मुलाखतीत केले होते. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे.


बाळासाहेब थोरात म्हणाले, की राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे, आमचे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधींनी जीवनात जे दुःख पाहिले आहे. त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करतायत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत.’

sharad pawar couldnt understand rahul gandhi

राहुल गांधी करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत. त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडलेत असे वाटते, असा पलटवार थोरात यांनी केला आहे.

राष्ट्रीय पक्ष दीड वर्षे विना अध्यक्ष कसा राहु शकतो, कपील सिब्बल यांचा कॉंग्रेस नेतृत्त्वाला सवाल

यशोमती ठाकूर यांच्या पवारांवरील वक्तव्याचे थोरात यांनी समर्थन केले आहे. महाआघाडी सरकार टिकावे असे वाटत असेल, तर आमच्या नेत्यांसंबंधी विधाने करताना विचार करावा, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला होता. काँग्रेस जनांना जे वाटले ते त्या बोलल्या आहेत. आमच्या काँग्रेस जणांचे मत यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात