रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठे नाशिक मुक्कामी ?


  • पोलिसांनी हॉटेलवर छापा; मात्र बोठे फरार,मदत करणाऱ्यांचा शोध सुरु

 विशेष प्रतिनिधी

नाशिक : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार सकाळचा निवासी संपादक बाळ ज. बोठे नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला मात्र, तोपर्यंत तो तेथून निघून गेला.तपास पथकातील एका अधिकाऱ्याकडून ही खात्रीशीर माहिती मिळाली. Police trace bal bothe in nashik

जरे यांची गेल्या सोमवारी नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात हत्या झाली होती. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पत्रकार बोठे हा सूत्रधार असल्याचे व त्यानेच सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तेव्हापासून बोठे फरारी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचे मोबाइल फोन, पासपोर्ट, वाहने घरीच आढळून आली आहेत. त्याच्याकडील परवानाधारक शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. Police trace bal bothe in nashik

काल तपास पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बोठे नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये थांबला आहे. माहिती मिळाल्यावर तपास पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. ज्या हॉटेलमध्ये तो थांबला आहे, तेथे जाऊन कसून तपासणी करण्यात आली.

तो तेथे थांबला असल्याच्या माहितीची खात्री झाली असली तरी पोलीस पोहोचेपर्यंत तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. आता हॉटेलमध्ये अधिक चौकशी सुरू असून, त्या आधारे शोध सुरू आहे. यापूर्वी काही ठिकाणांहून अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र, नाशिकमधील माहिती खात्रीशीर होती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. तरीही तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येते.

Police trace bal bothe in nashik

दरम्यान, या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिल बालकल्याण अधिकारी विजयमाला माने यांची आज पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी त्यांची भेट घडवून देण्यात आली. काल त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. आज आणखी काही माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पत्रकार बाळ ज. बोठे, सागर भिंगार दिवे यांनी दिली रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांना दुपारी पुन्हा पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मधल्या काळात त्यांच्याकडून बरीच माहिती, पुरावे, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, सुपारीची रक्कम आणि अन्य पुरावे संकलित करण्यात आलेले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात