हैदराबादेतील मर्यादित यशाने भाजपसाठी दक्षिणेचा महा दरवाजा नाही, तर दिंडी दरवाजा उघडला


  • भाजपची मुसंडी मोठी पण विजयाच्या कुंपणाच्या आत, टीआरएसला मोठा फटका

वृत्तसंस्था

हैदराबाद : हैदराबादेत भाजपने मुंसडी तर मोठी मारली पण ती विजयाच्या कुंपणाच्या बरीच आत पडली. हैदराबादच्या मर्यादित यशाने भाजपसाठी दक्षिण भारताचा महादरवाजा खुला नाही झाला, पण दिंडी दरवाजा मात्र नक्की उघडला असे मानावे लागेल. bjp hyderbad news

भाजपच्या नेत्यांनी सर्व देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक निकालात चांगलेच चढउचार बघायला मिळाले. भाजपची सुरुवातीला वेगात असलेली गाडी रोखण्यात टीआरएसला यश मिळाले. परंतु, दुपारनंतर चित्र काहीसे पालटले. टीआरएसने आघाडी घेतली. bjp hyderbad news

बहुमताकडे नाही, पण सर्वांत मोठा पक्ष म्हणून तो उदयाला आला. असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयने आधीच्या जागा कशाबशा टिकवल्या. मात्र या निकालांतून भाजपला तुलनेत मोठा फायदा झाला. भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. ३ वरून त्या पक्षाने जागांची ४० शी गाठली. याचा टीआरएस आणि एएमआयएमला मोठा धक्का बसला आहे.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार TRS 66, भाजप 34 आणि AIMIM 37 जागांवर आघाडीवर आहे. हैदराबादच्या निकालांनी उत्साहित झालेले भाजपचे नेते सांबित पात्रा यांनी तर 2023 मध्ये तेलंगणात भाजपचे सरकार येणार असल्याचा अतिरंजित दावा केला.

सगळ्याच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. भाजपचे राष्ट्रीय नेतेही यावेळी प्रचारात उतरले होते. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भाजपला आपली पकड मजबूत करायची असून त्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे.

भाजपकडून अमित शाह यांच्यापासून ते स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी कंबर कसली होती. हैदराबादमध्ये कमळ फुलवण्याचा निश्चय करत त्यांनी प्रचार केला. त्यात त्यांना मर्यादित यश मिळताना दिसत आहे.

bjp hyderbad news

नगरपालिका निवडणुकीत देशात पहिल्यांदाच भाजप इतक्या आक्रमक आणि पूर्ण तयारीनिशी उतरल्याचे पाहायला मिळाले. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही तयारी असल्याची चर्चा आहे. 2023 रोजी तेलंगणात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीला जरी वेळ असला तरी भाजपसाठी इथल्या 24 विधनसभेच्या जागा आणि 5 लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजपने ही पूर्वतयारी केली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात