ठाकरे–पवार सरकारचा औरंगाबादेतील शेतकरी आंदोलकांवर पोलिसी बळाचा वापर


  • दिल्लीतील आंदोलनावरून मात्र मोदी सरकारवर दुगाण्या

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादेतील शेतकरी आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून मोडीत काढले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी कारखाना सुरु करावा, गोठवण्यात आलेले शेतकऱ्यांचे बँक खाते सुरू करावे.

थकीत सुमारे 11 कोटी रुपये परत मिळावेत, आमदार प्रशांत बंब यांच्यासह इतरांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी मनसेचे संतोष जाधव यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत क्रांती चौक ते प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, ठिय्या व निदर्शने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ठाकरे – पवार सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मोडून काढले.

मागण्या मान्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी संतापून मोर्चा काढला. तो क्रांती चौकातील मुख्य रस्त्यावर जाऊन रस्ता रोकोत रुपांतर झाले. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे निमित्त सांगून पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून शेतकऱ्यांना तेथून हटविले. पोलिसांना लाठीमार केला. यात प्रमुख नेत्यांनाही पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. दरम्यान, पोलिसांनी अनेकांना अटक करुन आंदोलन मोडून काढले.

गंगापूर सहकारी कारखाना भंगार म्हणून काही संचालक मंडळाने विक्रीस काढला आहे. याला आमदार प्रशांत बंब व सभासद शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. सोन्यासारखा कारखाना शेतकऱ्यांच्या परिश्रमातून उभा राहिला आहे. त्याची आम्ही माती होऊ देणार नाही. त्यामुळे कारखाना सुरू करावा, बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे, खोटे गुन्हे दाखल करून सभासद शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत ते तातडीने सुरु करावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते तथा मनसे पदाधिकारी संतोष जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

चर्चा निष्फळ, रस्ता रोको, आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

अधिकाऱ्यांना बाहेर बोलवा, नाही तर आम्हांला आत जाऊ द्या अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. त्यावर प्रादेशिक साखर कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. स्वामी यांनी दुपारी दीड वाजता आंदोलकांशी चर्चेसाठी खाली आले व आपल्या मागण्यांसंदर्भात पुणे येथे बैठक सुरू असून या बैठकीसाठी प्रादेशिक सहसंचालक गेलेले आहेत. बैठकीत जो निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला सोमवारी कळवू. तोपर्यंत आपले निवेदन आम्हाला द्या व आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन स्वामी यांनी शेतकरी व आंदोलकांना केले.

आताच निर्णय घ्यावा म्हणत आंदोलकांनी क्रांती चौकामध्ये रास्ता रोको करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांना बळाचा वापर करून शेतकऱ्यांना हटविले. पोलिसांनी लाठी केला. यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा भाजप नेते रमेश गायकवाड, सदस्य मधुकर वालतुरे, आंदोलनाचे आयोजक संतोष जाधव यांच्यासह शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा मार बसला. पोलिसांनी आंदोलकांच्या मागे धाव घेऊन अनेकांना अटक करत आंदोलनच मोडीत काढले.

आमदार प्रशांत बंब यांची क्रांती चौकात धाव, पोलिसांना खडसावले

आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांना मिळताच त्यांनी क्रांती चौकात धाव घेतली पोलिस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, संभाजी पवार यांच्याशी चर्चा करत लाठीमार का केला, परिस्थिती तेवढी गंभीर नसताना का केले, असा जाब विचारला. मस्तावलेले सरकार असून याचा आम्ही निषेध करतो, आंदोलन मोडीत काढल्यापेक्षा त्यांनी आंदोलन का केले? याचा तपास करून संबंधितांची चौकशी करा, अशा सूचना त्यांनी पोलिसांना केल्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात