हिंदूस्थानच्या आर्थिक इतिहासातील विक्रमी आर्थिक pakage ची घोषणा

आत्मनिर्भर भारताचा संकल्प; २० लाख कोटींच्या आर्थिक पँकेजची पंतप्रधानांची घोषणा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत अभियानासाठी २० लाख कोटी रुपयांते विशेष आर्थिक पँकेज मी जाहीर करतो. भारतीय जीडीपीच्या १०% आहे. हे पँकेज २०२० मध्ये नवी गती देईल. लँड, लेबर, लिक्विडिटी, लॉ यावर भर देतील. सर्व प्रकारच्या उद्योगाला याचा लाभ मिळेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शेतकरी, कामगार यांच्यासाठी लाभदायक ठरेल. भारतीय उद्योगांना याचा लाभ होईल. याची माहिती उद्यापासून अर्थमंत्री देतील. त्याच बरोबर मोठे रिफॉर्म लागू केले जातील.

देशवासीयांना आदरपूर्वक नमस्कार. कोरोना संकट येऊन चार महिने झालेत. ४२ लाख लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. साडेतीन लाख लोक मृत्यू पावलेत. भारतातही अनेकांनी स्वजन गमावले आहेत. हे जगासाठी मोठे युद्ध आहे. मानवजातीसाठी अकल्पनीय आहे. पण हरणे मानवाला मंजूर नाही. आपल्याला सतर्क राहून वाचायचे आहे. आमचा संकल्प मजबूत करण्याची ही वेळ आहे. लोकल ला आपल्याला ब्रँड बनवावे लागेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी ८.०० वाजता केली. २१ वे शतक हिंदूस्थानचे आहे. कोरोना संकटानंतरही आपण भारतीय दृष्टीने पाहतो त्यावेळी वाटते हे शतक भारताचे आत्मनिर्भर भारत. एष: पंथ: आत्मनिर्भर भारत.

राष्ट्र म्हणून एका मोठ्या वळणावर उभे आहोत. कोरोना संकट सुरू झाले तेव्हा पीपीई किट बनत नव्हते. आज भारतात २ लाख पीपीई किट, २ लाख एन ९५ मास्क बनत आहेत. भारताने संकटाचे संधीत रूपांतर केले आहे.

जगात आत्मनिर्भर बनण्याची व्याख्या बदलत आहे. आर्थिक केंद्रीत विकासापेक्षा मानवकेंद्रीत विकासाकडे जग चालले आहे. भारताच्या आत्मनिर्भर व्याख्येत जय जगतचा समावेश आहे. वसुधैव कुटुंबकम पृथ्वीला आम्ही माता मानतो. असा भारत जेव्हा आत्मनिर्भर बनतो तेव्हात त्यातच विश्वकल्याण सामावले आहे.

भारत जगाची तसबीर बदलतो. भारताच्या प्रत्येक मोहिमेचा प्रयोग जगावर प्रभाव टाकतो. इंटरनँशन सोलर अलायन्स, योग, भारताची औषधे ही जगाला देणगी आहे. भारताच्या १३० कोटी नागरिकांचा आत्मनिर्भर राहण्याचा संकल्प. देश विश्व कल्याणाच्या मार्गाने चालला. आज गुलामीनंतर भारत विश्व कल्याणाच्या मार्गावर दृढसंकल्पित आहे. वाय टू के संकटातून भारताने जगाला वाचवले.

भारत उत्पादन वाढवेल, गुणवत्ता वाढवेल, संसाधने वाढवेल. भारत आपल्या क्षमतेनुसार गुणवत्तेनुसार जगासाठी हे काम करेलच करेल. भूकंपानंतर कच्छ उभा राहिलेला मी पाहिला आहे.

भारत आत्मनिर्भर : इकॉनॉमी. क्वांटम जंप, पायाभूत सुविधा : आधुनिक भारताचा पाया. आमची नवी व्यवस्था तंत्रावर आधारित असेल. व्हायब्रंट डेमॉग्राफी आमची ताकद आहे. डिमांड सप्लाय चेनचा पूर्ण वापर. या पाच स्तंभांवर भारताच्या आत्मनिर्भर बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

रिफॉर्म शेती, उद्योग, सेवा यासाठी होतील. मनुष्यबळ यासाठी केले. हे आत्मबलातून राबवले जातील. आपण यातून स्पर्धेत जिंकू. आर्थिक पँकेज मध्ये सर्व क्षेत्रांचा विचार केला आहे. भारतीयांनी या संकटात धैर्य दाखविले आहे. गरीब व्यावसायिकांनी या काळात त्याग करावा लागला आहे. गरीब, मजूर, पशूपालक, मच्छिमार या सर्वांसाठी आर्थिक पँकेज मध्ये लाभ मिळेल. लोकल प्रॉडक्टला प्राधान्य देऊन ग्लोबल करू. लोकलसाठी व्होकल बना. लोकल प्रॉडक्टचा प्रचार केला.

कोरोना संकट कायम राहण्याचा धोका आहे. आम्ही मास्क वापरू, लॉकडाऊन ४ नव्या रूपात होईल. राज्यांनी सूचना येताहेत. लॉकडाऊन ४ च्या सूचना १८ मे पूर्वी दिल्या जातील. त्या पाळू. भारताला आत्मनिर्भर बनवू. कोरोना युद्धात देशवासीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल मोदी यांनी आभार मानले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात