चीनी व्हायरसचा धोका दिसल्यास अलर्ट देणारा आणि संसर्गापासून वाचण्यासाठी आणि लक्षणासंबंधी माहिती देणाऱ्या आरोग्य सेतू अॅपवरून आता राहूल गांधी यांनी टीका सुरू केली आहे. चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठीच्या या तंत्रज्ञानाला राहूल गांधी नाकारत असल्याने जीव महत्वाचा की मोबाईलमधील सुरक्षितता असा सवाल नेटकऱ्यांनी त्यांना केला आहे. ही पाळत नाही तर पंतप्रधान सर्वांना सुरक्षा कवच पोहोचवित आहेत, अशी टीकाही त्यांच्यावर केली जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसचा धोका दिसल्यास अलर्ट देणारा आणि संसर्गापासून वाचण्यासाठी आणि लक्षणासंबंधी माहिती देणाऱ्या आरोग्य सेतू अॅपवरून आता राहूल गांधी यांनी टीका सुरू केली आहे.
चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठीच्या या तंत्रज्ञानाला राहूल गांधी नाकारत असल्याने जीव महत्वाचा की मोबाईलमधील सुरक्षितता असा सवाल नेटकºयांनी त्यांना केला आहे. ही पाळत नाही तर पंतप्रधान सर्वांना सुरक्षा कवच पोहोचवित आहेत, अशी टीकाही त्यांच्यावर केली जात आहे.
मोबाइल अॅप आरोग्य सेतू कोविड-१९ चा धोका दिसल्यास अलर्ट करण्यास मदत करतो. लोकांना याची पुरेसी माहिती, करोनाच्या संसगार्पासून वाचण्यासाठी आणि याच्या लक्षणासंबंधीची माहिती या अॅपवरून दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये मन की बात या कार्यक्रमात आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन देशवासियांना केले होते.
हे अॅप स्मार्टफोनच्या ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाला ट्रेस करण्यास मदत करतो. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ८ कोटी वेळा अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. आता सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांनाही हे अॅप बंधनकारक केले आहे. त्यामुळे एक प्रकारचे सुरक्षा कवच नागरिकांना मिळाले आहे. आरोग्य सेतू अॅप हे एक सोशल ग्राफचा वापर करतो. तुम्ही चीनी व्हायरसच्या हाय रिस्कच्या गटात आले तर तुम्हाला अलर्ट मिळेल. हाय रिस्क गटात आल्यानंतर अॅप टेस्ट सेंटरला जाण्यासाठी सूचना करेल. मात्र, राहूल गांधी यांनी यावरून वेगळेच राजकारण सुरू केले आहे.
Daily a new lie. Aarogya Setu is a powerful companion which protects people. It has a robust data security architecture. Those who indulged in surveillance all their lives, won’t know how tech can be leveraged for good! https://t.co/t8ThXmddcS— Ravi Shankar Prasad (@rsprasad) May 2, 2020
Daily a new lie. Aarogya Setu is a powerful companion which protects people. It has a robust data security architecture. Those who indulged in surveillance all their lives, won’t know how tech can be leveraged for good! https://t.co/t8ThXmddcS
राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. ते म्हणतात, आरोग्य सेतू अॅप ही एक निरीक्षण करणारी प्रणाली आहे. ते एका खासगी ऑपरेटरकडून आउटसोर्स केले गेले आहे. याशिवाय कुठल्याही सरकारी संस्थेचं त्यावर नियंत्रण नाहीए. यामुळे डाटा आणि गोपीनियतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला सुरक्षित ठेवण्यात मदत करते. पण नागरिकांच्या सहमतीशिवाय त्यांच्यावर पाळत ठेवणं चुकीचं आहे. भीतीच्या नावाखाली फायदा उचलणं चुकीचे आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड-१९ कंटेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या लोकांना आरोग्य सेतू मोबाइल अॅपचा वापर करणे गरजेचे आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार, सरकारी आणि खासगी सेक्टरमधील सर्व कर्मचाºयांना आरोग्य सेतू मोबाइल अॅपचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. सर्व संस्थेच्या प्रमुखांकडे ही जबाबदारी सोपवली आहे. कंपनीमधील सर्व कर्मचारी याचे १०० टक्के पालन करतात की नाही, याची जबाबदारी कंपनीच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App