ट्रम्पच्या कथित इशार्‍यापूर्वीच भारताने दिली होती औषधांच्या निर्यातीला नियंत्रित परवानगी; देशाची गरज भागविल्यानंतरच निर्यात


सोमवार, दि. ६ एप्रिलला आरोग्य मंत्रालयाने हायड्रोऑक्सिक्लोरीक्विन व पॅरासिटॅमल उत्पादक कंपन्यांशी सविस्तर चर्चा केली होती. देशांतर्गंत मागणी, धोऱणात्मक साठा आणि शेजारील छोट्या देशांची आवश्यकता हे लक्षात घेऊन, निर्यातीला नियंत्रित परवानगी देण्याचा निर्णय झाला. तसा आदेशही काढला. कदाचित त्याची माहिती नसल्याने ट्रम्प यांनी तथाकथित इशार्‍याची भाषा केली असावी…


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या विस्फोटाने गांगरून केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तथाकथित इशारा देण्यापूर्वीच भारताने हायड्रो ऑक्सिक्लोरीक्विन आणि पॅरासिटॅमल या दोन औषधांच्या नियंत्रित निर्यातीला परवानगी दिली आहे. सहा एप्रिलला दुपारीच हा निर्णय भारताने घेतला होता. देशांतर्गंत गरज भागवूनच या दोन्ही औषधांची निर्यात केली जाणार आहे. त्याचा फायदा अमेरिकेसह तीस देशांना होऊ शकतो.

हायड्रो ऑक्सि क्लोरीक्विन आणि पॅरासिटॅमल ही दोन औषधे प्रामुख्याने मलेरियाच्या उपचारासाठी वापरली जातात. मात्र, हायड्रो ऑक्सि क्लोरोक्विन हे औषध चीनी व्हायरसच्या उपचारासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे अमेरिकी वैद्यकीय क्षेत्राचा निष्कर्ष आहे. हे औषध रूग्णांसाठी रामबाण ठरत असल्याचे अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. गंमत म्हणजे, भारतात मात्र हे औषध रूग्णांना नव्हे, तर डाॅक्टर, नर्सेस, वाॅर्डबाॅय आदी ‘फ्रंट लाइन सोल्जर्स’साठी पू्र्वकाळजी म्हणून वापरले जात आहे.

या दोन्ही औषधांचा भारताकडे मुबलक साठा आहे. मात्र, चीनी व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि अमेरिकी निष्कर्ष ध्यानात ठेऊन भारत सरकारने २५ मार्चलाच त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. एवढेच नव्हे, अशा बंदीपासून सवलत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांनासुद्धा विशेष अधिकारांचा वापर लावून निर्यात बंदी घातली होती.

मात्र, त्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधून हायड्रो ऑक्सि क्लोरीक्विन अमेरिकेला देण्याची खास विनंती केली होती. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स यासह सुमारे तीस देशांनीही मोदी सरकारला विनंती केली होती. ही औषधे अस्थिरोग, मलेरिया यांच्यावर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच आता चीनी व्हायरसला रोखण्यासाठीही त्याची आवश्यकता भासू शकते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आरोग्य मंत्रालयामध्ये हायड्रो ऑक्सि क्लोरीक्विन व पॅरासिटॅमल उत्पादक कंपन्यांशी सविस्तर चर्चा झाली. देशांतर्गंत मागणी, धोऱणात्मक साठा आणि शेजारील छोट्या देशांची आवश्यकता हे लक्षात घेऊन, निर्यातीला नियंत्रित परवानगी देण्याचा निर्णय झाला. त्या पद्धतीचा आदेशही काढण्यात आला आहे. कदाचित त्याची माहिती ट्रम्प यांना नसल्याने त्यांनी तथाकथित इशारयाची भाषा केली.

‘व्हाइट हाऊस’मधील पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, “मोदी यांनी इतर देशांना निर्यात बंद केल्याचे मला माहित आहे. माझे त्यांच्याशी चांगले बोलणे झाले आहे. भारत व अमेरिकेचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अमेरिकेला हे औषध न देण्याचा निर्णय झाला असेल (मला माहित नाही..) तर आश्चर्यकारक आहे. तसे झाले असेल तर मोदींनी मला सांगायला हवे. तरीही ते अमेरिकेला औषधे देणार नसेल तर ठीक आहे… पण मग प्रत्युत्तर द्यावे लागेल… आणि का देऊ नये?”


‘गेमचेंजर’ औषध…

  •  हायड्रो ऑक्सि क्लोरीक्विन व पॅरासिटॅमिल या हिवतापविरोधी औषधांचा भारत हा जगातील सर्वांत मोठा उत्पादक आहे.
  •  उपचारांतील प्रारंभिक सकारात्मक निष्कर्षांमुळे अमेरिकेने हाय़ड्रो ऑक्सि क्लोरोक्विनचा ३ कोटी गोळ्यांचा धोरणात्मक साठा तयार ठेवला आहे. ट्रम्प यांनी या औषधाला चीनी व्हायरसविरुद्धच्या लढाईतील गेमचेंजर असे म्हटलेले आहे.
  •  सध्या अमेरिकेमध्ये पावणेतीन लाखांहून अधिक रूग्ण व दहा हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. विशेषतः न्यूयाॅर्कमध्ये या चीनी व्हायरसचे थैमान चालू आहे.
  •  न्यूयाॅर्कव्यतिरिक्त मिशिगन, टेक्सास, कॅलिफोर्निया आदी राज्यांमध्ये हायड्रो ऑक्सि क्लोरोक्विनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात