कोविडच्या विस्फोटाला तोंड देण्यास सज्ज…२७०० हाॅस्पिटल्स, २.६० लाख बेड्स, २० लाख पीपीई किटस, ५२ लाख एन ९५ मास्क


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, तब्बल ३१९ जिल्ह्यांमध्ये या चीनी व्हायरसचा संसर्ग पोहोचलेला नाही. नागालंड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव, सिक्कीम आदी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजपर्यंत एकही रूग्ण नाही, तर गेल्या ४८ तासांमध्ये तब्बल १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकही नवा रूग्ण नाही.


सागर कारंडे

नवी दिल्ली : कोविड १९ या चीनी व्हायरसचा भारतात कधी विस्फोट (पीक पिरीएड) कधी होईल, याबाबत मतमतांतरे असले तरी विस्फोटाचा संकटाला तोंड देण्याइतपतची वैद्यकीय तयारी भारताची झाली असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते आहे. फक्त कोविड उपचारांसाठी २७०० हाॅस्पिटल्स, सुमारे २ लाख ६० हजार खास बेड्स, सात हजारांहून जास्त क्वारंनटाइन केंद्रे उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर डाॅक्टर्स, नर्सेस आदी कोरोना योद्धांना लागणारी १९ लाख २२ हजार व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे (पीपीई किटस) आणि ५१ लाख ६२ हजार एन ९५ मास्क केंद्र सरकारने राज्य सरकारांना पुरविलेली आहेत. शिवाय ११ लाखांच्या आसपास चाचण्यांदेखील झालेल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी तयार केलेल्या अहवालामध्ये २ मे पर्यंत भारताची वैद्यकीय तयारीचा आढावा घेतला आहे. ‘द फोकस इंडिया’ला हा अहवाल पाहता आला. त्यातून विस्फोटाच्या संकटास तोंड देण्याइतपत वैद्यकीय तयारी होत असल्याचे चित्र दिसते आहे. ४ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ४२६७० रूग्ण (पैकी ११७७५ कोरोनामुक्त) असून मृत्यू पडलेल्यांची संख्या १३९५ इतकी आहे. अजूनही महाराष्ट्र हाच कोरोनाच्या तक्त्यात क्रमांक एक असून राज्यात १२९७४ रूग्ण व ५४८ मृत्यू झालेले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या या अहवालामध्ये अनेक महत्वपूर्ण बाबींची माहितीदेखील आहे. उदाहरणार्थ, तब्बल ३१९ जिल्ह्यांमध्ये या चीनी व्हायरसचा संसर्ग पोहोचलेला नाही. नागालंड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव, सिक्कीम आदी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजपर्यंत एकही रूग्ण नाही. गेल्या ४८ तासांमध्ये तब्बल १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये (अंदमान, अरूणाचल, आसाम, चंडीगढ, छत्तीसगड, गोवा, हरयाना, हिमाचल, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम, पुदच्चेरी) एकही नवा रूग्ण सापडलेला नाही. १३० जिल्हे हाॅटस्पाॅट (साधारणतः रेड) आहेत, तर २८४ जिल्हे हाॅटस्पाॅट नाहीत; पण तिथे संसर्ग (साधारणतः आॅरेंज) पोहोचलेला आहे.

  केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन

चाचण्या कमी होत असल्याची टीका सुरूवातीला झाली होती, पण आता त्यांचा वेग विलक्षण वाढलेला आहे. आतापर्यंत जवळपास ११ लाख चाचण्या झाल्या असून प्रतिदिन ७५ हजारांच्या आसपास त्या होत आहेत. प्रतिदिन एक लाख चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. पीपीई किट्सवरून प्रारंभी सरकारला टीकेला सामोरे जावे लागत होते. आता मात्र त्याचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असल्याचे अहवाल सांगतो. आतापर्यंत केंद्राने राज्यांना १९ लाख २२ हजार किटस दिलेले आहेत.

या अहवालानुसार, अशी आहे भारताची वैद्यकीय तयारी…

(२ मे पर्यंतचा तपशील)

संसर्गाची तीव्रता…

हाॅटस्पाॅट जिल्हे : १३०
हाॅटस्पाॅट नसलेले जिल्हे : २८४
संसर्ग न झालेले जिल्हे : ३१९

उपलब्ध हाॅस्पिटल्स आणि बेड्स…

फक्त कोविडसाठीची हाॅस्पिटल्स : ८००
फक्त कोविडसाठीचे बेड्स : १४२६६६
पैकी आयसीयू बेड्स : १७९७९
फक्त कोविडसाठीची आरोग्य केंद्रे : १९००
आरोग्य केंद्रांतील एकूण बेडस : ११८८७४
पैकी आयसीयू बेड्स : ९७६४
एकूण क्वारंनटाइन केंद्रे : ७१३७

वैद्यकीय साहित्य…

पीपीई किट्सचे राज्यांना वितरण : १९.२२ लाख
एन ९५ मास्कचे राज्यांना वितरण : ५१.६२ लाख

चाचण्या

एकूण चाचण्या : १०,४९,२१४
प्रतिदिन चाचण्यांची सरासरी क्षमता : ८५०००
२ मे रोजी झालेल्या चाचण्या : ७३,०४८
प्रतिदिन चाचण्यांचे लक्ष्य : १,००,०००

(संदर्भ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अहवाल)

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!