Navratri Special : मोदी सरकारमधील उच्चशिक्षित मंत्री शोभा करंदलाजे, आरएसएसला समर्पित केले जीवन, अशी आहे राजकीय कारकीर्द


Navratri Special : नवरात्री 2021 निमित्त आम्ही देशभरातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा परिचय करून देत आहोत. याच मालिकेत प्रसिद्ध राजकारणी, मोदी सरकारमधील मंत्री खा. शोभा करंदलाजे यांची माहिती येथे देत आहोत. अभ्यासू नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या करंदलाजे यांचा राजकीय प्रवासही तितकाच रंजक आहे. Navratri Special Story On Union Minister BJP MP Shobha Karandlaje Know Political Carrier


संघाला समर्पित केले आयुष्य

शोभा करंदलाजे यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1966 रोजी झाला. त्यांचा जन्म दक्षिण कर्नाटकातील पुत्तूर येथे झाला. शोभा यांनी पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. शोभा करंदलाजे कर्नाटक भाजपमधील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. शोभा या अगदी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेल्या. त्यांनी आरएसएसला आपले जीवनच समर्पित केले. कधीही लग्न न करण्याचा प्रणही त्यांनी केला आहे. त्यांनी 1994 मध्ये शकुंतला शेट्टी यांच्यासोबत राजकीय कारकीर्द सुरू केली. बीएसवाय यांनी त्यांना कर्नाटक राज्यातील पहिल्या भाजप सरकारमध्ये मंत्री बनवल्यावर त्या प्रकाशझोतात आल्या. शोभा करंदलाजे कर्नाटकात शोभाक्का या नावाने सुपरिचित आहेत. शोभा करंदलाजे राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांच्या सशक्त हिंदुत्ववादी विचारांसाठी ओळखल्या जातात.

राजकीय प्रवास

शोभा करंदलाजे यांनी 1994 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक पदांवर राहिल्यानंतर शोभा करंदलाजे यांना 2004 मध्ये भाजपमध्ये MLC करण्यात आले. यानंतर, 2008 मध्ये त्या यशवंतपूर (बंगळुरू) मधून आमदार म्हणून निवडून आल्या. कर्नाटकात स्थापन झालेल्या भाजप सरकारमध्ये त्यांना पंचायती राज मंत्री करण्यात आले होते. त्यानंतर त्या चर्चेत आल्या. राजकीय संकटामुळे एक वर्षानंतर 2009 मध्ये राजीनामा दिला, परंतु 2010 मध्ये त्या पुन्हा मंत्री झाल्या आणि 2012 पर्यंत मंत्रिपदावर राहिल्या. 2012 मध्ये पुन्हा गोंधळ उडाला आणि भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कर्नाटक जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना कर्नाटक जनता पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष करण्यात आले. यानंतर, त्यांनी 2013 मध्ये पुन्हा निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या. 2014 मध्ये कर्नाटक जनता पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाली. अशा प्रकारे शोभा करंदलाजे पुन्हा भाजपमध्ये सामील झाल्या.

मोदी मंत्रिमंडळात समावेश

या वर्षी नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी असलेले अनेक महत्त्वाचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, बाबुल सुप्रियो यांच्यासह 12 महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. आता असे 43 भाजप नेते आहेत ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी एक म्हणजे शोभा करंदलाजे. शोभा करंदलाजे देशभरातील लोकांना कदाचित परिचित नसतील, पण त्या कर्नाटक भाजपच्या दिग्गज नेत्या मानल्या जातात. शोभा करंदलाजे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या. सध्या त्या लोकसभेच्या खासदार आहेत. शोभा करंदलाजे या काही वादातही राहिल्या आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.

Navratri Special Story On Union Minister BJP MP Shobha Karandlaje Know Political Carrier

महत्त्वाच्या इतर बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात