विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत होणार आहे.Yogi Adityanath to contest Assembly elections from Ayodhya
योगी आदित्यनाथ हे पूर्वी लोकसभा खासदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विक्रमी यश मिळविल्यावर मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या नावावर ती शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यावेळी योगी आदित्यनाथ हे विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.
मात्र आता या विधानसभा निवडणुकीमध्ये मथुरा आणि अयोध्या या दोन मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगी आदित्यनाथ यांच्या विधानसभा मतदारसंघाचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून सुरु होणाºया बैठकीत उत्तर प्रदेशातील पहिल्या तीन टप्प्यांच्या उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये कोअर ग्रुपची बैठक पार पडली.
जवळपास बारा तासापेक्षा जास्त दोन्ही दिवस बैठकी झाल्या. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. उत्तरप्रदेशमध्ये होणार असलेली विधानसभा निवडणूक&ल्लु२स्र;अ२२ीेु’८ ए’ीू३्रङ्मल्ल 2022 ही सात टप्प्यात होत आहे. प्रत्येक टप्प्यासाठी वेगळी रणनीती आखायची असा निर्णय कोअर ग्रुपच्या बैठकीत झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App