उत्तर प्रदेशातील ८० विरुध्द २० ची लढाई, योगी आदित्यनाथ यांचा ३२५ जागा जिंकण्याचा दावा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात यावेळी ८० आणि २० मधील लढाई आहे. त्यामुळे भाजपा यावेळीही ३२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य पार करून मोठ्या बहुमतासह सरकार स्थापन करेल, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.Yogi Adityanath claims to have won 325 seats in a battle of 20 against 80 in Uttar Pradesh

उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले नाही तर काय करणार, अशी विचारणा केली असता योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जर तरचा विषयच नाही आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, ८० आणि २० असे विभाजन होणार आहे.



भाजपा निर्विवाद बहुमतासह सरकार स्थापन करेल. ८० टक्क्यांसह भाजपा ३२५ जागा जिंकेल. पहिल्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंत भाजपाच्या बाजूने वातावरण राहिले. आता सातव्या टप्प्यात संपूर्ण समर्थन मिळेल.

गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशात एक मुख्यमंत्री दुसºयांदा सत्तेवर येत नाही, या मिथकाबाबत योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पुन्हा सरकार स्थापन करेल. तसेच उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री न बनण्याचे मिथकही तोडेल. तसेच सपाकडून मठामध्ये पाठवण्याच्या करण्यात येत

असलेल्या दाव्यांवर योगी आदित्यनाथ म्हणाले की, मी तर मठामध्ये राहणारा माणूस आहे. हे लोककल्याणाचे काम आहे. अशाप्रकारचे दावे विरोधी पक्षाची निराशा प्रदर्शित करतात. मी तर गोरखपूर येत जात असतो. अखिलेश यादवच निवडणुकीनंतर परदेशात जाण्यासाठीते तिकीट बुक केले आहे.

Yogi Adityanath claims to have won 325 seats in a battle of 20 against 80 in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात