योगगुरू रामदेवबाबा यांनी डॉक्टरांना विचारले २५ प्रश्न, अ‍ॅलोपॅथी इतके गुणकारी तर डॉक्टर आजारी का पडतात?


अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेले वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर आता योगगुरु रामदेव यांनी डॉक्टरांना २५ प्रश्न विचारले आहेत. अ‍ॅलापॅथी उपचार इतके गुणकारी आहेत तर अ‍ॅलापॅथी डॉक्टर आजारी का पडतात? असा सवालही त्यांनी केला आहे. थॉयरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर एक एक करत त्यांनी २५ प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाचं पत्रक त्यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे.Yoga guru Ramdev Baba asks doctors 25 questions, why do doctors get sick if allopathy is so effective?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेले वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर आता योगगुरु रामदेव यांनी डॉक्टरांना २५ प्रश्न विचारले आहेत. अ‍ॅलापॅथी उपचार इतके गुणकारी आहेत तर अ‍ॅलापॅथी डॉक्टर आजारी का पडतात? असा सवालही त्यांनी केला आहे.

थॉयरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर एक एक करत त्यांनी २५ प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाचं पत्रक त्यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे.



रामदेव बाबा यांनी विचारलेले प्रश्न पुढीलप्रमाणे :

1. अ‍ॅलोपॅथीकडे हायपरटेन्शन (बीपी) आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्सवर कुठला स्थायी उपचार आहे का?

2. अ‍ॅलोपॅथीकडे टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्सवर कायमस्वरुपी उपचार आहे का?

3. फार्मा उद्योगाकडे थायरॉईड , आर्थराइटिस, कोलाइटिस, अस्थमा अशा समस्यांवर निर्दोष उपचार आहे का?

4. अ‍ॅलोपॅथीकडे फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस, हॅपेटायटिस बरे करण्यासाठी औषध आहे का? ज्या प्रमाणे तुम्ही टी.बी. आणि देवी आदींवर औषध शोधले आहे तसेच लिव्हरच्या आजारांवर उपाय शोधा. आता अ‍ॅलोपॅथी सुरु होऊन 200 वर्षे झाली आहेत, जरा सांगाल.

5. फार्मा उद्योगांकडून हार्ट ब्लॉकेजला (ह्रदयातील ब्लॉक) रिव्हर्स करण्याचा उपाय आहे का? विना बायबास, विना शस्त्रक्रिया, विना अ‍ॅँजिओप्लास्टी कुठला स्थायी उपचार आहे का?

6. फार्मी उद्योगांमध्ये इनलार्ज हार्ट आणि इंजेक्शन-ई.एफ कमी झाल्यावर पेसमेकर न लावता, कोणता उपचार आहे जो हृदयाचा आकार आणि फंक्शन नॉर्मल करेल, त्याला कशाप्रकारे रिव्हर्स करु शकता, विना पेसमेकर त्याचा निर्दोष उपचार काय आहे?

7. कोलेस्ट्रॉलच्या रुग्णामध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स कमी करण्याचा आणि लिव्हरवर साईड इफेक्ट रहित एलोपॅथीमध्ये काय उपचार आहे?

8. फार्मा कंपन्यांकडे डोकेदुखी आणि मायग्रेनवर काही कायमस्वरुपी उपाय आहे? ज्यामुळे सततची डोकेदुखी आणि मायग्रेन होणार नाही.

9. फार्मा कंपन्यांमध्ये डोळ्यांवरील चष्मा हटवण्याचा आणि हिअरिंग हेड जाईल, असा कोणता उपचार आहे का?

10. पायरिया झाल्यावर, ज्यामुळे दात हलणे बंद होईल, हिरड्या मजबूत होतील, असं कोणतं औषध आहे का? ज्यामुळे कोट्यवधी लोक दुखी आहेत.

11. एका व्यक्तीचं रोज कमीत कमी अर्धा ते 1 किलो वजन कमी होईल. विना शस्त्रक्रिया बॅरियाट्रिक सर्जरी आणि लाईफोसेक्शन, कोणत्याही छेडछाडीविना, औषधं घ्या आणि वजन कमी करा, फार्मा इंडस्ट्रीकडे असं कुठलं औषध आहे का?

12. सोरायसिस, सोरायटिक अर्थरायटिस आणि पांढरे डाग यावर निर्दोष आणि स्थायी उपाय सांगा?

13. मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये एक्लोजिंग स्पॉन्डिलायसिसवर कायमस्वरुपी उपाय आहे का? फॅक्टर पॉझिटिव्हला निगेटिव्ह करण्याचा उपाय आहे का?

14. अ‍ॅलोपॅथीकडे पार्किन्सनवर निर्दोष आणि कायमस्वरुपी उत्तर आहे का?

15. साईड इफेक्ट रहित कब्ज, गॅस, अ‍ॅसीडिटीवर फार्मा कंपन्यांकडे कायमस्वरुपी उपाय आहे का?

16. अनिद्रा (इन्सोमनिया) लोकांना झोप येत नाही कारण तुमच्या औषधांचा परिणाम फक्त 4 ते 6 तासांसाठी राहतो. तो ही साईड इफेक्ट्ससह. अ‍ॅलोपॅथीमध्ये यावर कायमस्वरुपी उत्तर देता का?

17. स्ट्रेस हार्मोन्स कमी करण्यासाठी आणि गुड हार्मोन्स वाढवण्यासाठी, ज्यामुळे लोक तणावमुक्त आणि प्रसन्न राहतील. फार्मा कंपन्या यासाठी एखादे औषध सांगतील का?

18. इन्फर्टिलिटीमध्ये कृत्रिम साधनांविना टेस्ट ट्यूब बेबी जी अतिशय वेदनादायी असते, एलोपॅथीमध्ये असे एखादे औषध सांगाल ज्यात या समस्यांचं समाधान मिळेल. ज्यामुळे विना टेस्ट ट्यूब बेबी, नैसर्गिकरित्या गर्भधारणा होईल आणि लोकांचे पैसे वाचतील, असे एखादे औषध सांगाल का?

19. फार्मी कंपन्यांमध्ये वयवाढीला (ऐजिंग प्रोसेसला) रिव्हर्स करणारे एखादे औषध सांगा.

20 अ‍ॅलोपॅथीमध्ये विना साईड इफेक्ट हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी निर्दोष उपाय सांगाल?

21. माणूस हिंसक, क्रूर आणि राक्षसी बनला आहे. त्याला माणूस बनवणारे एखादे औषध अ‍ॅलोपॅथीमध्ये आहे का?

22. माणसाला ड्रग्ज, अन्य नशेपासून दूर करु शकेल असं एखादं औषध अ‍ॅलोपॅथीमध्ये आहे का?

23.अ‍ॅलोपॅथी आणि आयुवेर्दातील वाद संपवण्यासाठी फार्मा कंपन्यांकडे एखादे औषध आहे का?

24. फार्मा कंपन्यांकडे कोरोना रुग्णाला विना ऑक्सिजन सिलिंडर ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी कोणता उपाय आहे का?

25. अ‍ॅलोपॅथी सर्वशक्तिमान आणि सर्वगुण संपन्न आहे तर एलोपॅथीचे डॉक्टर आजारी पडताच कामा नयेत?

Yoga guru Ramdev Baba asks doctors 25 questions, why do doctors get sick if allopathy is so effective?

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात