देशातील पाच लाखांवर लघु उद्योगांना जागतिक बँकेची मदत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जागतिक बॅंकेने भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग क्षेत्राच्या मदतीसाठी ५० कोटी डॉलरच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. याअंतर्गत ५.५५ लाख लहान मोठ्या उद्योगांच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. World bank will help MSME in India

एमएसएमई क्षेत्राची उत्पादकता आणि वित्तीय व्यवहार्यता सुधारण्यासाठी मागील वर्षी तुलनेत जागतिक बॅंकेची आर्थिक भागीदारी १.२५ अब्ज डॉलर असून भारतातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना याचा फायदा होईल असे सरकारचे म्हणणे आहे. एमएसएमई क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. या क्षेत्राचा जीडीपीमधील हिस्सा ३० टक्के तर निर्यातीतील वाटा ४० टक्के आहे. परंतु देशातील ५.८ कोटी एमएसएमई उद्योगांपैकी ४० टक्क्यांहून अधिक उद्योगांना वित्त पुरवठ्यासाठी अधिकृत स्त्रोतांपर्यंत पोचता येत नाही.आशियाच्या एमएसएमई इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोग्रॅममध्ये ७५ कोटी डॉलरच्या प्रकल्पाला मागील वर्षी जुलैमध्ये मंजुरी देण्यात आली होती. लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्जाची गरज आणि रोख निधीची चणचण दूर करण्यासाठी या प्रकल्पाद्वारे साहाय्य करण्यात आले होते. या अंतर्गत आतापर्यंत ५० लहान मोठ्या उद्योगांना सरकारी योजनेतून अर्थसाहाय्य मिळाले होते.

World bank will help MSME in India

महत्त्वाच्या बातम्या