विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सियालकोट येथे आज एका कारखान्यातील मजुरांनी आपल्याच व्यवस्थापकाला भररस्त्यात जिवंत पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला. व्यवस्थापक श्रीलंकेचा होता.Workers killed lankan maneger in Pakistan
प्रियांथा कुमारा असे त्याचे नाव असून त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.या घटनेनंतर कारखाना परिसर सिल करण्यात आला आहे. सियालकोटच्या वजिराबाद रोडवर एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तेथे अचानक गोंधळ सुरू झाला.
मजुरांनी त्या कारखान्यातील व्यवस्थापकाला बाहेर ओढत आणले आणि बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असता त्याला रस्त्यावरच पेटवून दिले. पाकिस्तानमध्ये २०१० मध्ये अशीच घटना घडली होती. प्रियांथा याने अलीकडेच एक्स्पोर्ट मॅनेजर म्हणून कारखान्यात नोकरी सुरू केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App