काश्मीरी पंडीतांचा परतीचा मार्ग सुकर होईल का? द काश्मीर फाईल्सवर ओमर अब्दुल्ला यांचा गर्भित इशारा


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : सामान्य काश्मिरी 32 वर्षांपूर्वी जे घडले त्याबद्दल खूश् नाही. काश्मीरी पंडीतांना खोरे सोडण्यास भाग पाडले गेले. आज सर्व काश्मिरी जातीयवादी आहत, सर्व काश्मिरी इतर धमार्तील लोकांना सहन करत नाहीत, असा आभास निर्माण केला जात आहे. यातून काय साध्य होणार आहे?Will it be easier for Kashmiri Pandits to return? Omar Abdullah’s implicit warning on The Kashmir Files

त्यामुळे त्यांच्या परतीचा मार्ग सुकर होईल का? असा गर्भित इशारा जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिला आहे. आज काश्मिरी मुस्लिमांविरुद्ध जो द्वेष निर्माण केला जात आहे, देव न करो, राज्याबाहेर शिकत असलेल्या आमच्या मुलांना त्याचा फटका बसू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.नॅशनल कॉन्फरन्सने शुक्रवारी ह्यद काश्मीर फाईल्सवर आपले मौन सोडले. यावर बोलताना अब्दुल्ला म्हणाले, या चित्रपटात सत्याचा विपर्यास करण्यात आला आहे. कारण चित्रपट निर्मात्यांनी मुस्लिम आणि शीखांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले आहे ज्यांना दहशतवादाचा सामना करावा लागला होता.

‘द कश्मीर फाइल्स’ हा व्यावसायिक चित्रपट असेल, तर कोणालाच काही हरकत नाही, पण जर चित्रपट निर्मात्यांनी तो वास्तवावर आधारित असल्याचा दावा केला तर त्यात तथ्य त्याच्या अगदी उलट आहे.जव्हा काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराची दुदैर्वी घटना घडली तेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री नव्हते.

जगमोहन हे राज्यपाल होते. केंद्रात व्हीपी सिंग यांचे सरकार होते. त्याला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता, असेसांगत अब्दुल्ला यांनी ही वस्तस्थिती चित्रपटापासून दूर का ठेवली, असा सवाल केला.अब्दुल्ला म्हणाले, जर काश्मिरी पंडित दहशतवादाला बळी पडले असतील,

तर आम्हाला त्याबद्दल अत्यंत खेद वाटतो, परंतु त्याच बंदुकीने ज्यांना लक्ष्य केले गेले होते ते मुस्लिम आणि शीखांचे बलिदान विसरू नका. काश्मीरी पंडीत अद्यापही परतले नाहीत. आज असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे की ज्यांनी आपली घरे सोडली होती त्यांना आपण परत आणू शकू.

मात्र त्यासाठी जातीय तेढ निर्माण करू नये. काश्मिरी पंडितांच्या परतीसाठी वातावरण तयार केले जाईल. पण ज्या लोकांनी हा चित्रपट बनवला आहे, त्यांना काश्मीरी पंडितांनी परतावे असे वाटत नाही. त्यांना पंडितांनी नेहमी बाहेर राहावे असे वाटते.

अब्दुल्ला म्हणाले की, जगभरात मुस्लिम समुदायाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.मुख्यमंत्री असताना अब्दुल्ला यांनी दहशतवाद सुरू झाल्यापासून घडलेल्या घटनांचा तपास करण्यासाठी सत्य आणि सामंजस्य आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती.

Will it be easier for Kashmiri Pandits to return? Omar Abdullah’s implicit warning on The Kashmir Files

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था