भाजपशी लढण्यापेक्षा कॉँग्रेस आपसांत लढण्यातच जास्त व्यस्त, ओमर अब्दुल्ला यांची टीका


विशेष प्रतिनिधी

जम्मू : भाजपशी लढण्यापेक्षा कॉँग्रेसचे राज्यातील नेते आपसांत लढण्यातच जास्त व्यस्त आहेत. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाशी मुकाबला करण्यात यशस्वी होतील असे मानणे खूप अवघड आहे, अशी टीका जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमदर अब्दुल्ला यांनी केली आहे.Omar Abdullah’s criticism that the Congress is more engaged in fighting among itself than fighting with the BJP

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी ट्वीट केले की काँग्रेसचे नेते जेव्हा आपसात लढण्यात व्यस्त आहेत.



त्यामुळे कॉँग्रेसकडून ते भाजपशी लढतील असे मानणे चुकीचे ठरेल असेच आता वाटू लागले आहे. जवळजवळ 200 लोकसभा जागा आहेत जिथे काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत कुरबुरीला कंटाळून अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अमरिंदर सिंग संपूर्ण मंत्रिमंळासह राजीनामा सुपूर्द केला.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाच नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

नवज्योतसिंग सिद्धू, सुनील जाखड, प्रतापसिंग बाजवा, राजकुमार वेरका आणि बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू यांची नावे चर्चेत आहेत.दुसºया बाजुला कॅ. अमरिंदरसिंही बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये उभी फुट पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

Omar Abdullah’s criticism that the Congress is more engaged in fighting among itself than fighting with the BJP

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात