कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची तर महाराष्ट्रात परंपरा, उध्दव ठाकरे यांचे काय होणार?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची परंपराच आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्याचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत पोहोचत असल्याने आता उध्दव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदही कुटुंबियामुळेच जातेय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.What will happen to Uddhav Thackeray, tradition in Maharashtra if he goes to the post of Chief Minister due to his family?

नातेवाईकामुळे मुख्यमंत्रीपद गेल्याची पहिली घटना १९८६ साली घडली होती. तत्कालिन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुलीच्या एमडीच्या परीक्षेत गुण वाढवून घेतल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे निलंगेकर यांना राजीनामा द्यावा लागला होता.शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनाही आपल्या कुटुंबाचाच फटका बसला होता.



त्यांचे जावई गिरीश व्यास यांना जागा देण्यासाठी प्रभात रस्त्यावर शाळेसाठी आरक्षित जागेवरील आरक्षण उठवले. पत्रकार विजय कुंभार आणि नितीन जगताप यांनी यावर न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे १९९९ साली मनोहर जोशी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर न्यायालयाने मनोहर जोशी यांना दोषीही ठरविले होते. ही इमारत शासनाला परत द्यावी लागली होती.

कॉँग्रेसचे विलासराव देशमुख यांना मुलामुळे राजीनामा द्यावा लागला. मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्यात हॉटेल ताजमध्ये दहशतवादी घुसले होते. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना या घटनेवर चित्रपट काढायचा होता. त्यामुळे विलासराव देशमुख जेव्हा पहिल्यांदा ताजमध्ये पाहणी करायला गेले तेव्हा मुलगा रितेश देशमुख आणि वर्मा सोबत होते. ही घटना उघड झाल्यावर देशमुख यांच्यावर टीका झाली. त्यामुळे २००८ साली त्यांना राजीनामा द्यावा लागला.

कॉँग्रेसचेच अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपदही नातेवाईकांमुळेच गेले. मुंबईमध्ये सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर इमारत बांधली गेली. आदर्श नावाने बांधलेल्या या इमारतीत चव्हाण यांच्या सासूच्या नावाने फ्लॅट घेण्यात आला. आदर्श घोटाळ्याने राज्याच्या राजकारणात वादळ उठले. त्यामध्ये शेवटी चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला. आता उध्दव ठाकरे यांनाही नातेवाईकांनीच अडचणीत आणले आहे.

What will happen to Uddhav Thackeray, tradition in Maharashtra if he goes to the post of Chief Minister due to his family?

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात