ED Uddhav Thackeray : श्रीधर पाटणकरांवर मनी लॉन्ड्रिंगची कारवाई; बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक; 30 कोटींचे विनातारण कर्ज


प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज मंगळवारी धडक कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. पण ईडीची ही कारवाई नेमकी आहे तरी काय? ED Uddhav Thackeray shridhar patankar

ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिली आहे. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. वर झाली आहे. या कंपनीच्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लॉन्ड्रिंग बाबत ही कारवाई आहे.

– 21.46 कोटींची मालमत्ता आधीच जप्त

या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. चंद्रशेखर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचे दाखवले. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात ही अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.

आता या सर्व नोंदी ईडीचे अधिकारी न्यायालयापुढे ठेवणार आहेत. त्यानंतर श्रीधर पाटणकर तसेच नंदकिशोर चतुर्वेदी, महेश पटेल यांना प्रत्यक्ष चौकशी आणि तपासासाठी बोलवून अटकेची देखील कारवाई होऊ शकते, असे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

ED Uddhav Thackeray shridhar patankar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात