‘…इथे मुस्लिमांना तुमच्या नावाने घाबरवलं जातं’ पत्रकाराच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर दिलं योगी आदित्यनाथ यांनी?


विशेष प्रतिनिधी

उत्तर प्रदेश : पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पाश्र्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या पातळीवर आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा चंग बांधला आहे. तर नुकताच योगी आदित्यनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांनी योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारला की, उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या नावाने मुस्लिमांना घाबरवलं जातं. आम्हाला मत द्या, नाहीतर योगी येतील, असं सांगितलं जातं. यावर तुमचं काय मत आहे?

What is the answer of  Yogi Adityanath to the question of a journalist?


CM YOGI IN ACTION: पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर योगी सरकारची मोठी कारवाई; देशद्रोहाचा खटला दाखल


यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, माझ्या नावावर कोणालाही घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. इथे कायद्याचे पालन करतात, कायद्याच्या राज्यावर ज्यांना विश्वास आहे त्या सर्वांना इथे सन्मानाने आणि गौरवाने राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जर कोणी इथे कायदाच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना मात्र कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

What is the answer of  Yogi Adityanath to the question of a journalist?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात