ममता बॅनर्जींसोबतच्या चर्चेत स्वरा भास्कर काय म्हणाली?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या वेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बऱ्याच बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. रिचा चढ्ढा, तुषार गांधी, विद्या चव्हाण, मेधा पाटकर, मुकुल रोहतगी, महेश भट, शत्रुघ्न सिन्हा, स्वरा भास्कर हे सर्वजण या चर्चेमध्ये उपस्थित होते.

What did Swara Bhaskar say in the discussion with Mamata Banerjee?

यावेळी आपले मत मांडताना स्वरा भास्कर हिने म्हटले आहे की, इथे उपस्थित असलेले इंडस्ट्री अगदी तरुण लोकांनाही बराच मोठा संघर्ष सहन करावा लागत आहे. कोणाला एक महिना जेलमध्ये काढावा लागत आहे तर कोणी काही बोलले म्हणून त्यांना विरोध केला जात आहे. आम्ही इथे सगळेच जण एम्प्लॉइड आहोत. आमच्याकडे कुणा कडेही काम नाहीयेत. प्रत्येक जण इथे आपापल्या वैयक्तिक पातळीवर एक लढा लढत आहे. हे लोक जेव्हा भारतात काय घडत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी त्यांना मोठा विरोध सहन करावा लागतो आहे.


“पद्म पुरस्कार येत आहे” , विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया


पुढे स्वरा म्हणते की, आपण एक अशा समाजामध्ये राहतो. जिथे एकीकडे एक पूर्ण बेजबाबदार जमाव आहे. त्याचमुळे सत्ताधारी लोकांना आपल्याला हवा तसा त्यांचा फायदा करून घेता येत आहे. पोलिसांना आणि सरकारला यावर कोणताही आक्षेप नाहीये. तर एक सरकार आहे जे अनिर्बंध सत्ता उपभोगताना दिसून येत आहे. यूएपीए आणि देशद्रोहाचे गुन्हे एका अशा देवाचा प्रसाद म्हणून आम्हाला दिला जातो ज्यांची आम्हाला अजिबात भक्ती करायची नाहीय. या सर्व गोष्टींमुळे आम्हाला काम मिळेल की नाही याची देखील शक्यता कमी आहे. असे तिने आपले मत मांडले आहे.

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी म्हटले, आर्यन खान प्रकरणांमध्ये शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला आहे. महेश भट्ट यांनादेखील जाणूनबुजून टार्गेट करण्यात आले होते. असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पुढे त्या असेही म्हणतात की, जर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर राष्ट्रीय पातळीवर भाजपला पराभूत करणे अतिशय सोपे आहे.

What did Swara Bhaskar say in the discussion with Mamata Banerjee?

 

महत्त्वाच्या बातम्या