विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी बहुचर्चित दिल्ली दौरा लांबविला असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना ते पुन्हा भेटणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.West Bengal Governor will meet Amit Shah once again
राज्यपाल पक्षपाती असल्याची टीका तृणमुल कॉंग्रेस तसेच डाव्या पक्षांनीही केली आहे.धनकर मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या दौऱ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे.
हा दौरा घटनात्मक शिष्टचारांचा भंग करणारा असल्याचा त्यांचा दावा आहे. निवडणुकीदरम्यान हिंसाचार उसळलेल्या ठिकाणी धनकर यांनी दौरे केल्यामुळे ममता संतापल्या होत्या.गुरुवारी धनकर यांनी शहा यांची भेट घेतली.
तेव्हाचे छायाचित्र त्यांनी ट्विट केले. ते दिल्लीहून शुक्रवारी पश्चिम बंगालला परतणार होते, पण त्यांनी प्रयाण लांबणीवर टाकले.धनकर यांनी या बैठकीत पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शहा यांना माहिती दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागल्यानंतर बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App