दरोडेखोरांमुळे गाजलेले चंबळचे खोरे आता होणार सुजलाम सुफलाम


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : एकेकाळी दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच फुलनदेवीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या चंबळच्या ओसाड खोऱ्यात आता नंदनवन फुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंबळ खोऱ्यात उन्नत आणि संकरित बियाण्यांची शेती विकसित करण्याचे नियोजन भारतीय बियाणे महामंडळाने केले आहे.Green revolution will change Chambal basin

या भागातील खासदार नरेंद्र सिंह तोमर हे सध्या केंद्रीय कृषीमंत्री आहेत. त्यांच्या पुढाकारातून ही योजना साकारली जात आहे. आपली कारकिर्दीत या भागाला सुजलाम सुफलाम करण्याची त्यांची महत्वाकांक्षी योजना आहे.



चंबळच्या खोऱ्यातील जमीन खडकाळ असून कृषीयोग्य समजली जात नाही. या खोऱ्यातील तीन लाख हेक्टरहून अधिक जमीन खडकाळ आहे. मात्र, ती विकसित केल्यास चंबळ व ग्वाल्हेरच्या खोऱ्याचा एकात्मिक विकास होण्यास मदत होईल, असे तोमर यांचे मत आहे.

आता संकरित बियाणे विकसित करण्यासाठी महामंडळाच्या पथकाने मोरेना जिल्ह्यातील चिनबरा आणि पिपराई गावांना भेटी दिल्या. या प्रस्तावित प्रकल्पासाठी अंदाजे २० हजार हेक्टर जमीनीची गरज आहे. राजस्थानातील कोटा शहरातही सुधारित व संकरित बियाण्यांचा असाच प्रकल्प विकसित केला जात आहे.

Green revolution will change Chambal basin

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात