बोस्टावानात सापडला तब्बल ७३ मिलीमीटर लांबीचा अनमोल हिरा


वृत्तसंस्था

बोस्टवाना : आफ्रिकेतील बोस्टवाना देशात जगातील तिसरा सर्वांत मोठा हिरा सापडला आहे. जगप्रसिद्ध हिरे कंपनी ‘द बिअर्स’चा एक भाग असलेल्या ‘देबस्वाना डायमंड’ या कंपनीला हा अनमोल हिरा सापडला असून त्याचे वजन एक हजार ९८ ग्रॅम कॅरेट आहे. Third largest diamond found in Bostwana

कंपनीच्या पाच दशकांच्या इतिहासात एवढा मोठा हिरा प्रथमच सापडला आहे. वॅनेंग या खाणीतून एक जूनला बाहेर काढलेला हा हिरा गुणवत्तेच्या आधरावर जगातील आतापर्यंतचा तिसरा मोठा हिरा आहे. त्याची लांबी ७३ मिलिमीटर आणि रुंदी ५२ मिलिमीटर आहे.याआधी ‘कलिनन डायमंड’ हा तीन हजार १०६ कॅरेटचा हिरा १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. त्यानंतर जगातील दुसरा मोठा हिरा ‘लेसेडी ला रोना’ हा बोस्टवानामध्येच २०१५ मध्ये मिळाला होता. एक हजार १०९ कॅरेट वजन असलेला हा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा होता. या हिऱ्याचे मूल्यांकन डायमंड ट्रेडिंग कंपनीकडून काही आठवड्यांत केले जाणार आहे. या हिऱ्याचे नामकरण अद्याप केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

Third largest diamond found in Bostwana

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती