तिसऱ्या लाटेच्या लढ्यासाठी केंद्र सरकार तयार करणार एक लाख कोरोना योद्धे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू नवनवीन प्रकारात पुढे येत असल्याने लोकांना सतत सावध राहावे लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. केंद्र सरकारच्या वतीने नजीकच्या काळात एक लाख कोरोना योद्धे तयार करण्याची योजना असून त्यांच्यासाठीच्या क्रॅश कोर्सचे उद्घा्टन मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.Central Govt. will skilled one lack covid warriors

देशातील २६ राज्यांत हा अभ्यासक्रम राबविण्यात येईल. पंतप्रधानांनी हेही स्पष्ट केले की हे एक लाख प्रशिक्षित आघाडीवीर ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामाजिक आरोग्य केंद्रे व विशेषतः ग्रामीण भागांत डॉक्टरांच्या मदतीसाठी तैनात केले जातील.त्यांचा दोन लाखांचा वैद्यकीय विमाही प्रशिक्षण काळातच काढला जाईल. या योजनेसाठी केंद्राने २७६ कोटींचा खर्च केला आहे. कौशल्य विकास योजनेचा हा तिसरा टप्पा आहे.कोरोनाची तिसरी लाट दरवाजावर असल्याचा इशारा वैज्ञानिक वारंवार देत आहेत.

त्यामुळे असे संकट ओढवले तरी त्याची संहारकता दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असावी असा उद्देश आहे. यादृष्टीने १११ प्रशिक्षण केंद्रांत एक लाख तरुणांना प्रशिक्षित करून त्यांची डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी नेमणूक केली जाईल.

Central Govt. will skilled one lack covid warriors

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती