पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी ४५ मतदारसंघात मतदान सुरु ; ३४२ उमेदवार रिंगणात


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले. या टप्प्यात 45 मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजता कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरु झाले. 342 उमेदवार रिंगणात आहेत. Voting begins in 45 constituencies for the fifth phase in West Bengal

या पाचव्या टप्प्यात उत्तर बंगालमधील 13 मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत. त्यात दार्जिलिंगमध्ये 5 , कालिम्पोन्ग आणि जलपायगूडतील 7 मतदारसंघाचा समावेश आहे.
पाचव्या टप्प्यात जलपायगूडी, कालिम्पोन्ग, दार्जिलिंग, नाडीया, उत्तर 24 परगणा आणि पूर्व वर्धमान जिल्ह्यातील 45 मतदारसंघात एकूण 15 हजार 789 मतदान केंद्रावर मतदान होत आहे.निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी केंद्राची 1071 सुरक्षा पथके तैनात केली आहेत. याशिवाय अतिरिक्त राज्याचा पोलीस फाटा तैनात केला आहे. त्यात 118 पोलीस कंपन्यांचा समावेश असून 15 हजार 790 कर्मचारी सुरक्षा पाहणार आहेत.

पाचव्या टप्प्यातील प्रमुख लढती

सिलिगुडी : माकपचे अशोक भट्टाचार्य विरुद्ध भाजपचे शंकर घोष, तृणमूल काँग्रेसचे ओमप्रकाश मिश्रा. अशोक भट्टाचार्य हे माजी महापौर असून उत्तर बंगालमधील मात्तबर कम्युनिस्ट नेते आहेत.

डमडम : तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री ब्रात्या बसू रिंगणात असून माकपचे पालाश दत्त आणि भाजपचे बिमल शंकर नंदा यांच्याशी त्यांचा सामना आहे.
बरसात : अभिनेते चिरंजीत चक्रवर्ती हे तृणमूलच्या तिकिटावर भाग्य आजमावत असून त्यांना भाजपचे शंकर चटर्जी आणि फॉरवर्ड ब्लॉकचे सानीब चट्टोपाध्याय टक्कर देत आहेत.

नक्षलबाडी आता भगवा पट्टा

मआओवाद्यांचा गड मानल्या गेलेल्या नक्षलबाडीचा लालपट्टा हा गेल्या पन्नास वर्षात आता भजपमुळे भगवा पट्टा बनला आहे. माटीगरा- नक्षलबाडी मतदारसंघातून भाजपचे आनंदमय बर्मन उमेदवार आहेत. काँग्रेसने विद्यमान आमदार शंकर मालाकार यांना तर तृणमूलने कॅप्टन नलिनी रंजन राय यांना तिकीट दिले आहे.

गुरखा जनमुक्ती मोर्चा आणि तृणमूल एकसाथ

दार्जिलिंग,कुरसेओंग आणि कालिम्पोन्ग मतदारसंघात तृणमूलने एकही उमेदवार दिला नाही. तेथे गुरखा जनमुक्ती मोर्चाचे उमेदवार रिंगणात आहेत.गुरखा जनमुक्ती मोर्चाने या निवडणुकीत अन्य ठिकाणी तृणमूल काँग्रेसला पाठींबा दिला आहे.

Voting begins in 45 constituencies for the fifth phase in West Bengal

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी