मतुआ मतदार ठरणार पश्चिम बंगालमध्ये गेमचेंजर, भाजपाला होणार फायदा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नागरिकत्व संशोधन कायद्याचा सर्वाधिक फायदा पश्चिम बंगालमधील मतुआ समजाला होणार आहे. त्यामुळे या समाजाने भाजपाला संपूर्ण पाठिंबा दिला असून विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणार आहे.Matua voters will be game changers in West Bengal, BJP will benefit


विशेष प्रतिनिधी 

कोलकत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नागरिकत्व संशोधन कायद्याचा सर्वाधिक फायदा पश्चिम बंगालमधील मतुआ समजाला होणार आहे. त्यामुळे या समाजाने भाजपाला संपूर्ण पाठिंबा दिला असून विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणार आहे.

पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांत मतुआ समाज आहे. मात्र, काही जिल्ह्यांत त्यांची संख्या जास्त आहे. या समुदायाला भाजपने स्थायी नागरिकत्व देण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व मिळण्याच्या आधी मतुआ समाजाने भारतीय मतदार नसल्याचे सिद्ध करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे हा समाज तृणमूल कॉँग्रेवर नाराज आहे.



नदिया जिल्ह्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर केले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. कारण नदिया बांगलादेश सीमेवर येते. या भागात घुसखोरी नेहमीच होत आली आहे. त्यामुळेही मतुआ समाज उत्साहात आहे.

बंगालमध्ये मतुआ समाजाची लोकसंख्या दोन कोटींहून अधिक आहे. पूर्वी हा समाज डाव्या पक्षांच्या सोबत होता. परंतु, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भाजपाच्या बाजुने आला आहे. उत्तर व दक्षिण २४ परगणा जिल्ह तसेच नदिया जिल्ह्यात हा समाज प्रभावी आहे.

या जिल्ह्यांतील ४० विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. या समाजाच्या मतांमुळेच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळविल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ बीणापाणि मंदिरात दर्शन घेऊन केली होती.

बीनापाणि देवींना मतुआ समाज ‘बोरो मां’ म्हणजे ‘बड़ी मां’ म्हणतो. त्या समाजसुधारक हरिचंद्र ठाकुर यांच्या परिवारातील आहेत. 1860 मध्ये त्यांनी समाजातील प्रचलित वर्णव्यवस्था समाप्त करण्यासाठी लोकांना एकत्र केले होते.

२००३ मध्ये नागरिकत्व कायद्यात झालेल्या बदलांमुळे या समाजाला पुन्हा बांग्ला देशात पाठविण्याची भीती होती. परंतु, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे त्यांना भारतात शरण मिळणार आहे.पंतप्रधानांनी आपल्या बांग्ला देशाच्या दौऱ्यात मतुआ महासंघाचे संस्थापक हरिश्चंद्र ठाकूर यांच्या आराकांडी मंदिर आणि बरीसाल जिल्ह्यातील सुगंधा शक्तीपीठाला भेट दिली होती.

Matua voters will be game changers in West Bengal, BJP will benefit

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात