वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हंगामातील पहिली मँगो ट्रेन राजधानी नवी दिल्लीला शुक्रवारी पोचली आहे. आंबा म्हंटला की कोकणातील हापूस असे समीकरण ठरलेले असते. परंतु पहिली मँगो ट्रेन महाराष्ट्रातील कोकणातून नव्हे तर आंध्र प्रदेशातून दिल्लीकडे धावली आहे. The first mango special train of the season ran
आंध प्रदेशातील विजयनगरम येथून केवळ आंब्याच्या पेट्यानी भरलेली रेल्वे रवाना केली होती. 200 टन वजनाच्या 11 हजार 600 पेट्या पाठविण्यात आल्या. आझादपुर मंडाइचे तेजिंदर सिंग म्हणाले, यापूर्वी रेल्वेने चिक्कू, केळी आणि संत्र्याची वाहतूक केली होती. त्यात प्रथम संत्री पाठविण्यात आली होती. आता आंबा वाहतूक करून रेल्वेने नवा पायंडा पाडला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 20 विशेष रेल्वेद्वारे 4 हजार 350 टन आंब्याची वाहतूक केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App