हापूस आंबा उत्पादकांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ; ग्राहकांना थेट विक्री करण्यावर अधिक भर

वृत्तसंस्था

मुंबई : कोकण किनारपट्टीतील पाच जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते यांनी पुणे, मुंबई येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत आंबा पाठविण्याऐवजी आंब्याची थेट विक्री करत आहेत. खरेदीदार प्रामुख्याने राज्यातील अनेक भागातील आणि दिल्ली, गुजरातमधील आहेत. alphanso Mango Growers Back to Agricultural Produce Market Committee

राज्यात भाजप राजवट असताना भाजीपाला आणि फळे यांची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर परवानगी दिली होती. त्याचा फायदा आता आंबा उत्पादकांना मोठा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे म्हणाले, आंब्याची आवक मोठी झालेली नाही. पण, एका स्थिर प्रमाणात ती आता होत आहे.महाराष्ट्र फलोत्पादन मंडळाचे माजी सदस्य विवेक भिडे म्हणाले, उत्पादक आणि खरेदीदार यांच्यात थेट मोठी उलाढाल होत आहे. मोठ्या सोसायट्या आंब्याच्या खरेदीदार आहेत.
हापूस आंब्याला भौगोलिक स्थान विशेष दर्जा असून तो प्रामुख्याने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख हेक्टर क्षेत्रात आंब्याचे भरघोस उत्पादन घेतले जाते.

alphanso Mango Growers Back to Agricultural Produce Market Committee

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*