विशेष प्रतिनिधी
मुंबई : पॉर्न फिल्म बनविणारा प्रोड्युसर राज कुंद्रा याच्या घर झडतीसाठी पोलिस त्याला जुहू येथील घरी घेऊन आले, त्यावेळी त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात पोलिसांसमोरच कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर शिल्पाने रडतच पोलिसांना जबाब दिला.Violent altercation between Shilpa Shetty and Raj Kundra in front of police
राजने एवढी सगळी लफडी करून ठेवली, पण मला एक शब्दाने सांगितले नाही, असे तिने पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांसमोरच दोघांचे भांडण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.राज कुंद्रा याच्या पोलिस कोठडीत वाढ झाल्यानंतर प्रॉपर्टी सेलचे अधिकारी राज कुंद्राला घेऊन त्याच्या जुहू येथील बंगल्यावर घर झडती घेण्यासाठी आले होते.
या वेळी शिल्पा शेट्टी बंगल्यावरच होती, राज कुंद्रा पोलिसांसोबत घरी आल्यानंतर, त्याला त्या अवस्थेत बघून शिल्पाला प्रथम रडू कोसळले. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन शिल्पा त्याच्यावर भडकली आणि एवढी सर्व लफडी केलीस, मला एका शब्दाने देखील सांगितले नाहीस, यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांची समजूत काढली. नंतर शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवून घेतला. रडत रडतच तिने आपला जबाब पोलिसांना दिला. मला पॉर्न व्हिडिओबाबत काहीही कल्पना नव्हती, मी माझ्या कामात (शूटिंग) मध्ये व्यस्त होते, असे शिल्पाने आपल्या जबाबात म्हटले आहे.
तसेच राजने मला याबाबत कधीही काही बोलला नाही. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राज कुंद्रा याचे नाव देखील पॉर्न व्हिडिओमध्ये येत असल्याचे मला वृत्तपत्रातून कळले, असे शिल्पाने आपल्या जबाबात सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App