भयंकर : बंगाल निकालांबरोबरच हिंसाचारालाही सुरुवात, आरामबागमधील भाजप कार्यालय पेटवल्याचा तृणमूलवर आरोप

Violence erupts with Bengal Assembly Elections Results, Trinamool accused of setting fire to BJP office in Arambagh in Bengal

Bengal Assembly Elections Results : बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस येथे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही आणि परंतु येथे हिंसाचारालाही सुरुवात झाली आहे. बंगालमधील आरामबागमधील भाजप कार्यालयाला आग लावल्याची बातमी हाती आली आहे. भाजपने तृणमूलवर आरोप केले आहेत. मात्र, तृणमूलने ते फेटाळले आहेत.  Violence erupts with Bengal Assembly Elections Results, Trinamool accused of setting fire to BJP office in Arambagh in Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस येथे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही आणि परंतु येथे हिंसाचारालाही सुरुवात झाली आहे. बंगालमधील आरामबागमधील भाजप कार्यालयाला आग लावल्याची बातमी हाती आली आहे. भाजपने तृणमूलवर आरोप केले आहेत. मात्र, तृणमूलने ते फेटाळले आहेत.

आरामबागमधील भाजप कार्यालयात लागलेल्या आगीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जोशात भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ घालून आग लावल्याचा आरोप आहे.

निकाल समोर येताच बंगालमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. कूचबिहारमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच तेथील भाजपच्या कार्यालयाचीही तोडफोड केल्याच्या बातम्या आहेत.

यापूर्वी दुपारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी निकाल स्पष्ट होताच कोलकातामधील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करत भाजप कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तर निवडणूक आयोगाने विजयाचा आनंद साजरा न करण्याच्या कठोर सूचना दिल्या होत्या. असे असूनही टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी महामारीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ उडाला.

Violence erupts with Bengal Assembly Elections Results, Trinamool accused of setting fire to BJP office in Arambagh in Bengal

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात