Puducherry Election Results Live : पुडूचेरीत भाजपने पहिले खाते उघडले ; उमेदवार नमशिवायंम विजयी : ३० पैकी १० जागा जिंकून आघाडीवर


विशेष प्रतिनिधी

पुडूचेरी : केंद्र शासित प्रदेश पुडूचेरी येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने पहिले खाते सायंकाळी उघडले. मन्नाडीपेट मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नमशिवायंम विजयी झाले आहेत.BJP opens first account in Puducherry Leading by winning 10 out of 30 seats

दरम्यान, माजी मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित आघाडीने राज्यात 10 जागा जिंकल्या असून एकावर आघाडी घेतली आहे.काँग्रेसप्रणित आघाडीने 3 जागा जिंकल्या असून 4 जागांवर आघाडी घेतली आहे. इतर पक्ष 3 जागेवर आघाडीवर आहेत.



राज्यात 30 जागांसाठी 6 एप्रिलला एका टप्प्यात मतदान झाले होते. पुडुचेरी येथे एकूण विधानसभेच्या एकूण 33 जागा असून त्यापैकी 3 सदस्य नामनिर्देशित आहेत. अशा प्रकारे केवळ 30 जागांवर निवडणुका घेतल्या जात आहेत.

एन रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी १६ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित १४ जागांवर भाजपाने नऊ आणिएआयएडीएमके ५ जगावर मैदानात आहे.

त्याचप्रमाणे कॉंग्रेस १४जागांवर निवडणूक लढवत असून, त्या जागेवर अपक्षांना पाठिंबा दर्शविला जात आहे, तर त्याचे मित्रपक्ष द्रमुक व अन्य पक्ष 13 जागांवर निवडणूक लढवित आहेत.

BJP opens first account in Puducherry Leading by winning 10 out of 30 seats

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात